१९ गावांमध्ये बसणार सीसीटीव्ही
By admin | Published: May 14, 2017 12:59 AM2017-05-14T00:59:46+5:302017-05-14T00:59:46+5:30
बेकायदेशीर कृत्य व गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी नारायणगाव पोलीस ठाण्यांतर्गत १९ गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : बेकायदेशीर कृत्य व गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी नारायणगाव पोलीस ठाण्यांतर्गत १९ गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. सध्या ८ गावांमध्ये ४९ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली .
मुजावर म्हणाले की,नारायणगाव पोलीस ठाण्यांर्तगत असणाऱ्या गावामध्ये एक वर्षपासून चोऱ्या , दरोडे ,महिलांची छेडछाड , दोन गटातील मारामाऱ्या, भांडणे आदी प्रकारचे गंभीर गुन्हे कमी करण्यात पोलिसांना यश आहे.
अनेक गुन्हे हे सायंकाळी ते पहाटे पर्यंतच्या वेळेत घडत असतात. गुन्हेगारी व बेकायदेशीर कृत्यावर वचक याबसण्साठी ठाण्यांतर्गत चार वाहने व पथक रात्रीच्या वेळी रोज गस्तीसाठी प्रत्येक गावात, वस्त्यांवर फिरत आहेत. बऱ्याच गुन्ह्यामध्ये घटना कशी घडली, कश्यासाठी, कोणी घडविली याचा शोध घेणे कठीण जाते.
पोलीस कर्मचारी संख्या बळ कमी असल्याने तपास करण्यास विलंब होतो, कामकाजावर ताण पडतो.
याचाच फायदा गुन्हेगार घेत असतात. अशी कृत्ये घडू नयेत यासाठी सर्व गावांच्या प्रवेशद्वार ,मुख्य रस्ता ,गदीर्ची व महत्वाची ठिकाणे महामार्ग ,राज्यमार्ग ,जिल्हा मार्ग अश्या ठिकाणी सुरक्षितेच्या दृष्टीने चांगल्या व उत्तम प्रतीचे सीसी कॅमेरे लावण्याचे काम सुरु आहे .
सध्या नारायणगाव व वारूळवाडी या गावांमध्ये २२ कॅमेरे ,निमगाव सावा ,आर्वी ,पिंपळगाव ,औरंगपूर ,पारगाव येथे लोकसहभागातून २७ कॅमेरे बसविण्यात येत आहे.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई म्हणाल्या की जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्या मार्गदर्शनाखाली
गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांनी
महत्वाच्या गावांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याचे सांगितले आहे.
त्याप्रमाणे तालुक्यात नव्हे
तर जिल्ह्यात सर्वात जास्त सीसी
कॅमेरे नारायणगाव पोलीस
ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बसविण्यात आले आहेत .
नारायणगाव बस स्थानकात मंगळसूत्र,बॅगा ,दुचाकी चोरी जाण्याचे प्रकार घडत असतात . यावर वचक बसण्यासाठी बस स्थानक व लोकसहभागातून काल गुरुवार (दि ११) १२ सीसी कॅमेरे बसवून त्याचे उदघाटन जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. हे कॅमेरे मुजावर ,वाहतूक निरीक्षक महेश विटे ,सचिन दाते यांच्या सहकार्ऱ्याने बसविण्यात आले आहेत.