‘रुग्णालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणेसह सीसीटीव्ही कॅमेरे’
By admin | Published: July 13, 2017 05:34 AM2017-07-13T05:34:15+5:302017-07-13T05:34:15+5:30
राज्यातील आरोग्यसेवेची उपलब्धता आणि दर्जा उंचाविण्यासाठी आरोग्य विभागाच्या अंतर्गत रुग्णालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा सुरू होणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील आरोग्यसेवेची उपलब्धता आणि दर्जा उंचाविण्यासाठी आरोग्य विभागाच्या अंतर्गत रुग्णालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा सुरू होणार आहे, तसेच बायोमेट्रिकच्या समोरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. या सीसीटीव्ही कॅमेरा रेकॉर्डिंगच्या सात दिवसांच्या अहवालाची माहिती रुग्णालयांनी वरिष्ठ यंत्रणांना कळवावी, असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले.
राज्यातील विविध भागांतील आरोग्यसेवाविषयक समस्यांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी मंत्रालयातील आरोग्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. या वेळी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी रुग्णालयांसाठी बायोमेट्रिक यंत्रणेंबाबत सविस्तर चर्चा केली.