सीसीटीव्हीला अखेर मुहूर्त
By admin | Published: October 1, 2016 01:42 AM2016-10-01T01:42:26+5:302016-10-01T01:42:26+5:30
२६/११ च्या हल्ल्यानंतर ऐरणीवर आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विषयाला आता न्याय मिळाला आहे. १ हजार ५१० ठिकाणी ४ हजार ७१७ कॅमेरे बसविण्यात आले असून त्यांचे लोकार्पण
मुंबई : २६/११ च्या हल्ल्यानंतर ऐरणीवर आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विषयाला आता न्याय मिळाला आहे. १ हजार ५१० ठिकाणी ४ हजार ७१७ कॅमेरे बसविण्यात आले असून त्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २ आॅक्टोबरला होणार आहे. षण्मुखानंद सभागृहात हा समारंभ होईल.
या वेळी सेवा हमी कायद्यांतर्गत १६३ नवीन सेवा आॅनलाइन करणे, नागपूर जिल्हा डिजिटल जिल्हा घोषित करण्याचा उपक्रम आणि अवैध मद्य निर्मूलनाच्या कृती आराखड्याचे विमोचनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, विविध विभागांचे मंत्री या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
या सीसीटीव्ही यंत्रणेची माहिती साठविण्यासाठी दोन ठिकाणी अद्ययावत डाटा सेंटर उभारण्यात आली आहेत. तर मुंबई पोलीस आयुक्तालय, कलिना आणि वरळी येथील वाहतूकपोलीस मुख्यालय या तीन ठिकाणी संनियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. (विशेष प्रतिनिधी)
२० थर्मल कॅमेरे
एकूण ४७१७ कॅमेऱ्यांमध्ये ३७२७ फिक्स्ड् बॉक्स कॅमेरे, ९७० पीटीझेड कॅमेरे, २० थर्मल कॅमेरे आहेत. तर ५ मोबाइल व्हिडीओ सर्व्हिलन्स व्हॅन्सचा समावेश आहे.
हे सर्व कॅमेरे, कमांड व कंट्रोल सेंटर आणि मोबाइल व्हॅन हे एकमेकांशी फायबर, वायरलेस, व्ही सॅट यासारख्या अत्याधुनिक नेटवर्क कनेक्टिव्हीटीद्वारे जोडण्यात आले आहेत.