पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही
By Admin | Published: August 14, 2014 03:39 AM2014-08-14T03:39:02+5:302014-08-14T03:39:02+5:30
कोठडीतील संशयित मृत्यूच्या वाढत्या प्रमाणाची दखल घेत उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य शासनाला प्रत्येक पोलीस ठाण्यात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले़
मुंबई : कोठडीतील संशयित मृत्यूच्या वाढत्या प्रमाणाची दखल घेत उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य शासनाला प्रत्येक पोलीस ठाण्यात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले़
न्या़ व्ही़ एम़ कानडे व न्या़ प्रमोद कोदे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ मुळात संशयित आरोपीच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांचीच आहे़ असे असतानाही कोठडीतील मृत्यूप्रकरणात महाराष्ट्र आघाडीवर आहे़ हे गैर असून यापुढे प्रत्येक आरोपीच्या आरोग्याची जबाबदारी पोलिसांचीच असेल, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले़
काही दिवसांपूर्वी वडाळा रेल्वे पोलिसांच्या कोठडीत एका मुलाचा मृत्यू झाला़ मात्र पोलिसांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली़ अशाप्रकारे विविध ठिकाणच्या दोन ते तीन याचिका न्यायालयात दाखल झाल्या़ त्याची दखल घेत न्यायालयाने या सर्व याचिका ंएकत्रितपणे सुनावणीसाठी दाखल करून घेतल्या़ (प्रतिनिधी)