एसटी स्थानकांमध्ये सीसीटीव्ही

By admin | Published: November 16, 2016 05:49 AM2016-11-16T05:49:28+5:302016-11-16T05:49:28+5:30

प्रवाशांच्या सुरक्षितता लक्षात घेता, एसटी महामंडळाने राज्यातील सर्व स्थानकांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

CCTV at ST stations | एसटी स्थानकांमध्ये सीसीटीव्ही

एसटी स्थानकांमध्ये सीसीटीव्ही

Next

मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षितता लक्षात घेता, एसटी महामंडळाने राज्यातील सर्व स्थानकांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून, लवकरच त्याला अंतिम स्वरूपही देण्यात येईल, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.
राज्यात एसटीचा पसारा खूप मोठा असून, त्यातून ६४ लाख प्रवाशांची वाहतूक होते. जवळपास ५६८ बस स्थानकांमध्ये १८ हजार गाड्यांची ये-जा होत असते. एवढा मोठा पसारा असणाऱ्या एसटी स्थानकांमध्ये मात्र, सुरक्षेविषयीची बोंबच आहे. २0१२ मध्ये पुण्याच्या स्वारगेट स्थानकातून संतोष माने या वाहकाने बस पळवली आणि बेदरकारपणे बस चालवून अनेक वाहनांना धडक दिली. यात ९ जण ठार तर २७ जखमी झाले. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला. ही घटना ताजी असतानाच, त्यानंतर २0१३ मध्ये लातूरमधील एसटी बसमध्ये असलेल्या एका पार्सलमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये १७ प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. तरीही एसटी महामंडळाकडून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. संतोष माने प्रकरणानंतर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली, परंतु अन्य बस स्थानके आणि तेथे येणाऱ्या हजारो प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे दिसून आले. आता एसटी महामंडळाने राज्यातील सर्व बस स्थानकांमध्ये दोन टप्प्यांत सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रियेचीही सुरुवात करण्यात आल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: CCTV at ST stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.