पुणे रेल्वे स्टेशनचा ९१वा वाढदिवस साजरा...

By admin | Published: July 27, 2016 09:24 PM2016-07-27T21:24:36+5:302016-07-27T21:24:36+5:30

गेले ९१ वर्ष कोट्यवधी नागरिकांनी ज्या ठिकाणाहून प्रवास केला आहे, अशा ऐतिहासिक वास्तूचा दर्जा असलेले पुणे रेल्वे स्टेशना बुधवारी ९१ वर्ष पुर्ण झाली

Celebrate 91rd birthday of Pune railway station ... | पुणे रेल्वे स्टेशनचा ९१वा वाढदिवस साजरा...

पुणे रेल्वे स्टेशनचा ९१वा वाढदिवस साजरा...

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २७ : गेले ९१ वर्ष कोट्यवधी नागरिकांनी ज्या ठिकाणाहून प्रवास केला आहे, अशा ऐतिहासिक वास्तूचा दर्जा असलेले पुणे रेल्वे स्टेशना बुधवारी ९१ वर्ष पुर्ण झाली. त्यानिमित्त पुणे विभागाचे रेल्वे व्यवस्थापक बी. के. दादभोय यांच्या हस्ते केक कापून या वास्तूचा वाढदिवस साजरा करण्यात आला. रेल्वे प्रवाशी ग्रुपकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  
    

गेल्या अनेक वर्षांतील नैसर्गिक आपत्कालिन परिस्थिती आणि दीड वर्षांपूर्वी लागलेली भीषण आग या घटना पचवित आजही ही इमारत दिमाखात उभी असून, प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहे. अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, वरिष्ठ परिचालक प्रबंधक अशोककुमार तिवारी, वरिष्ठ स्टेशन प्रबंधक ए. के. पाठक, जेआरपीएफचे मुख्य पोलीस निरीक्षक श्रीसागर, रेल्वेप्रवाशी गु्रपच्या अध्यक्षा हर्षा शहा, सचिव मिलींद शेडगे, केडगाव रेल्वे प्रवाशी ग्रुपचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्याध्यक्ष दिलीप कोळकर आणि रेल्वेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 
     

देशात अनेक अशी मोठी व पुरातन मंदिरे आहेत ज्यांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात येत आहे. त्याच पद्धतीने या वास्तूची निगा राखण्यात यावी. त्यासाठी राजस्थान मधील वास्तू तज्ञांचा सल्ला घ्या. कारण तेथील अनेक कारागीर अशा वास्तूंची देखभाल घेण्यात माहीर आहेत. त्यामुळे येथील ऐतिहासीकपणा कायम राहिल आणि गरजेचे ते बदल देखील होतील. तसेच इमारतीच्या समोर लेजर लाईटिंग करण्यात यावी. त्याद्वारे या इमारतीवर १२ महिने झगमगाट राहील, अशी मागणी यावेळी हर्षा शहा यांनी दादभोय यांच्याकडे केली. 

Web Title: Celebrate 91rd birthday of Pune railway station ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.