२९ आॅगस्ट अवयवदान दिन म्हणून साजरा करा - गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 05:14 AM2017-08-30T05:14:45+5:302017-08-30T05:15:56+5:30

राज्यात अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या आणि अवयव दानाचे प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना अवयव मिळत नाही. हे चित्र बदलण्यासाठी अवयव दानासंदर्भात जनजागृती व्हावी

Celebrate August 29 as Organ Ordnance - Girish Mahajan | २९ आॅगस्ट अवयवदान दिन म्हणून साजरा करा - गिरीश महाजन

२९ आॅगस्ट अवयवदान दिन म्हणून साजरा करा - गिरीश महाजन

Next

मुंबई : राज्यात अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या आणि अवयव दानाचे प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना अवयव मिळत नाही. हे चित्र बदलण्यासाठी अवयव दानासंदर्भात जनजागृती व्हावी आणि अवयव दान मोहिमेत जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढावा, यासाठी दरवर्षी २९ आॅगस्ट हा दिवस ‘अवयव दान दिन’ म्हणून साजरा करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी घोषित केले.
अवयव दान जागृती संदर्भात मंगळवारी मरीन ड्राइव्ह येथे सुमारे १२ हजार लोकांची दोन किलोमीटर लांबीची मानवी साखळी तयार करण्यात आली होती. अवयवदान संदर्भात जनजागृतीसाठी राज्यपातळीवर अभियान हाती घेण्यात आले आहे. शहरांबरोबरीनेच गाव पातळीवर ही मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रत्येक गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून आज जे. जे. महाविद्यालय, ग्रॅण्ट रुग्णालय, खासगी तसेच शासकीय वैद्यकीय व्यवसायिक, इंडियन मेडिकल असोसिएशनसारख्या संस्था आणि अन्य मान्यवर नागरिकांची मानवी साखळी तयार करण्यात आली होती. यावेळी झालेल्या कार्यक्रमात अवयवदान जागृती विषयावरील राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धा व पथनाट्य स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
अवयवदानात महाराष्ट्र राज्य हे देशात दुसºया क्रमांकावर आले आहे. यापूर्वी ते सहाव्या क्रमांकावर होते. या विषयी जाणीव जागृती केल्यामुळे अवयवदात्यांची संख्या वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवयवदान अभियानास महोत्सव स्वरूपात साजरे करण्याचे ‘मन की बात’ या कार्यक्रमातून सूचित केले होते. लोकजागृती मधून या अभियानास लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्यास राज्य पहिल्या क्रमांकावर येण्यास वेळ लागणार नाही, असे महाजन यांनी नमूद केले. डॉक्टरांनी अवयवदानाचे महत्त्व पटवून द्यावे, असेही ते म्हणाले.


अवयवदान जनजागृतीसाठी मोबाइल अ‍ॅप
अवयवदानाचे महत्त्व चित्ररूपात कळावे यासाठी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात अवयवदान याविषयावरील चित्रांचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. तसेच अवयवदानाची माहिती असलेल्या मोबाइल अ‍ॅपचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनात एकूण चौदा चित्रे लावण्यात आली आहेत. यात रुग्णाला अवयवदानाचे महत्त्व पटवून देणारे चित्र, नेत्रदानासंदभार्तील चित्र, तसेच जीवंतपणी करता येण्यासारखे अवयवदान समजवून सांगणारे चित्र यासारखी चित्रे लावण्यात आली आहेत. या चित्रांची संकल्पना आणि रेखाटन जे. जे. महाविद्यालयातील माजी विद्यार्थी सूरज कटारे यांनी केले आहे. हे चित्र प्रदर्शन दोन दिवस खुले राहणार आहे. त्यासोबत अवयवदान नोंदणी कक्षदेखील मंत्रालयात उभारण्यात आला.

Web Title: Celebrate August 29 as Organ Ordnance - Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार