न्यायालयाचा आदर राखूनच दहीहंडी साजरी करा
By admin | Published: June 21, 2016 03:46 AM2016-06-21T03:46:14+5:302016-06-21T03:46:14+5:30
दहीहंडीची उंची २० फुटापेक्षा अधिक असावी आणि १२ वर्षांवरील गोविंदांना पथकात सहभागी होता यावे, अशी भूमिका मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली
मुंबई : दहीहंडीची उंची २० फुटापेक्षा अधिक असावी आणि १२ वर्षांवरील गोविंदांना पथकात सहभागी होता यावे, अशी भूमिका मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मांडली पण ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या मर्यादेत राहूनच उत्सव साजरा करा’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी शेलार यांच्या भूमिकेला छेद दिला.
दहीहंडी आणि गणेशोत्सव आयोजनातील कायदेशीर अडचणी आणि उपाययोजनांबाबत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. मुख्यमंत्री म्हणाले की, पारंपारिक सणांचे स्वरु प बदलता कामा नये मात्र अशा प्रकारचे उत्सव साजरे करताना त्यामागची भावना लक्षात घेऊन ते साजरे केले पाहिजे. रस्त्यांवर मंडपांची उभारणी, ध्वनी प्रदूषण, दहीहंडी साजरी करताना सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाने उत्सव साजरा करताना गणेशोत्सव आणि दहीहंडी पथकांना नाहक त्रास देऊ नये. दरवर्षीचे जी नोंदणीकृत गणेश मंडळे आहेत त्यांना महापालिका आण िपोलिस प्रशासनाने स्वत:हून परवानगी देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मुंबईमध्ये गणेश मुर्तीकारांना महापालिकेमार्फत जागा उपलब्ध करु न देण्यात येते. त्याचे दर कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस नगरविकास, गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, पराग अळवणी, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, महाधिवक्ता रोहित देव, पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी, मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता आदी यावेळी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)