घुमान येथे साजरा होणार संत नामदेवांचा ७४६ वा जन्मोत्सव

By Admin | Published: July 3, 2016 06:01 PM2016-07-03T18:01:07+5:302016-07-03T18:01:07+5:30

संत शिरोमणी भक्त नामदेव महाराज यांचा ७४६ वा जन्मोत्सव नोव्हेंबरमध्ये पंजाब राज्यातील घुमान येथे भव्य स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे.

Celebrating Saint Naindev's 746th Birthday Celebration at Swamman | घुमान येथे साजरा होणार संत नामदेवांचा ७४६ वा जन्मोत्सव

घुमान येथे साजरा होणार संत नामदेवांचा ७४६ वा जन्मोत्सव

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३ : संत शिरोमणी भक्त नामदेव महाराज यांचा ७४६ वा जन्मोत्सव नोव्हेंबरमध्ये पंजाब राज्यातील घुमान येथे भव्य स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नांदेडसह राज्यातून हजारो भाविक जाणार आहेत. नानक - साई फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही घुमान जन्मोत्सव यवं पंजाब कुरूक्षेत्र दर्शनयात्रा काढण्यात येत आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पहिली संत नामदेव ग्रंथयात्रा नानक साई फाउंडेशन या संस्थेतर्फे काढण्यात आली होती. पहिली यशस्वी घुमान यात्रा आयोजित केल्यानंतर मागील वर्षी जन्मोत्सवाला दुसरी यात्रा काढून भाविकभक्तांना घुमानसह अमृतसर,वाघा बॉर्डर,चंदीगड, कुरूक्षेत्र, पानिपत, दिल्ली या ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडवले.
संत नामदेव महाराज यांच्या ७४६ व्या जन्मोत्सवानिमित तिसरी घुमान - पंजाब दर्शनयात्रा ९ नोव्हेंबर रोजी नांदेड येथून निघणार असून यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेत नांदेडसह कोल्हापूर,मुंबई,शिर्डी,पाथरी,उस्मानाबाद,निजामाबाद, अकोला, नागपूर, इंदोर, पुणे, नासिक,लातूर,औरंगाबाद येथील भाविक सहभागी होणार आहेत

Web Title: Celebrating Saint Naindev's 746th Birthday Celebration at Swamman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.