‘लोकमत दीपोत्सव’चा लोकार्पण सोहळा थाटात
By admin | Published: October 17, 2014 03:05 AM2014-10-17T03:05:23+5:302014-10-17T17:41:35+5:30
चित्रपट, नाटय़संगीत आणि चित्रकलेची सुरेख शाब्दिक मैफल जमवित बहुचर्चित ‘लोकमत दीपोत्सव’चा लोकार्पण सोहळा थाटात पार पडला.
Next
मुंबई : चित्रपट, नाटय़संगीत आणि चित्रकलेची सुरेख शाब्दिक मैफल जमवित बहुचर्चित ‘लोकमत दीपोत्सव’चा लोकार्पण सोहळा थाटात पार पडला. लोकमतचा दीपोत्सव हा साहित्य, शास्त्र, मनोरंजनाचा ठेवा आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी या अंकाचा गौरव केला.
रवींद्र नाटय़ मंदिराच्या कला अकादमी सभागृहात गुरुवारी पार पडलेल्या या सोहळ्य़ास ज्येष्ठ अभिनेत्री, मराठी नाटय़ संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा फैयाज, प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर, नेत्र शल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने, दिग्दर्शक मधुर भांडारकर, वृत्तपत्र विक्रेते बाजीराव दांगट आणि लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष, खासदार विजय दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर उपस्थित होते. या सोहळ्य़ाला कवी प्रवीण दवणो, पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील, मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ते उपायुक्त धनंजय कुलकर्णी आदी मान्यवर मंडळीही उपस्थित होती. सूत्रसंचालनाची धुरा ‘दीपोत्सव’च्या संपादिका अपर्णा वेलणकर यांनी सांभाळली.
याप्रसंगी फैयाज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, चार शब्दांऐवजी एखादं गाणं म्हणायला सांगा ते जमते. जे काही चांगले लिहिले जाते ते मी आर्वजून वाचते. त्यातील दीपोत्सव हा दिवाळी अंक सवरेत्तम आहे. तर वसंत देसाई यांच्या स्मृतींना उजाळा देत त्या काळात लोकमत माध्यम समूहाचे संस्थापक, संपादक जवाहरलाल दर्डा नाटक पाहायला यायचे ही आठवणही त्यांनी उलगडली. सत्कार स्वीकारणार नाही असे म्हटले होते, मात्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतरचा हा पहिलाच सत्कार सोहळा असून त्याबद्दल आनंद आहे, अशी कृतज्ञपूर्वक भावनाही त्यांनी व्यक्त केली. जवाहरलाल दर्डा हे वसंत देसाई यांचे जवळचे स्नेही होते. साहित्य, कला, नाटय़ आणि संगीत या सर्वच क्षेत्रत दर्डा यांची मुशाफिरी होती. देसाई यांच्यामुळे मी दर्डाशी परिचित झाले, आणि आजही ते नाते कायम असल्याचे फैयाज यांनी सांगितले. यावेळी लोकमतच्या वाचकांना यंदाची दिवाळी सुख-समाधान आणि समृद्धीची जावो अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
सुप्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांनी लोकमत ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशनासाठी उत्तम वेळ साधल्याचे सांगितले. मतदार राजा हा मतदान करून मोकळा झाला आहे, आणि युती-आघाडीची नवी समीकरणं जुळेर्पयत राजकारणी-कार्यकर्तेही रिकामे असल्याचीही पुष्टी जोडली. त्यामुळे लवकरात लवकर ‘दीपोत्सव’चा अंक उपलब्ध करून देऊन दिवाळीचा आनंद वाढवा, असा खुसखुशीत सल्लाही त्यांनी दिला. शिवाय, ‘दीपोत्सव’ या अंकातील ‘ट्रक आर्ट’वरील लेखाचा विशेष उल्लेख करुन त्याचे कौतुक केले. यावेळी, ‘दीपोत्सव’च्या प्रवासातील 2क्क्7 साली कवी ग्रेस यांनी संपादित केलेल्या अंकाची प्रत अजूनही
संग्रहात असल्याचेही त्यांनी
सांगितले.
दृष्टीदाता ही उपाधी मला ‘लोकमत’ने दिली आहे. माझं नाव घडवण्यात लोकमतचा सहभाग आहे. साहित्यिक, वैचारिक दिवाळी ‘दीपोत्सव’सह साजरी करा. मात्र, या दिवाळीमध्ये फटाके उडवू नका. या फटाक्यांमुळे लहान मुलांच्या डोळ्य़ांना इजा होते. दर दिवाळीमध्ये नेत्र विभाग चालू ठेवावा लागतो. कारण फटाक्यांमुळे लहान मुलांच्या डोळ्य़ाला इजा झाल्याने दरवर्षी 1क् ते 15 रुग्ण येत असतात. यामध्ये त्यांच्या आई-बाबांचा दोष असतो. यामुळे आनंदात दिवाळी साजरी करताना, फटाके फोडू नका, असा सल्ला नेत्रशल्यविशारद पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी दिला.
फैय्याज यांनी आपल्या मनोगताच्या समोरापाप्रसंगी काही ओळींनी उपस्थितांनी संबोधले. त्या अशा ‘आठवणी असतात त्या कालच्या असतात, जाणीव असते ती आजची असते, स्वप्नं मात्र उद्याची असतात.’.. या ओळींनी उपस्थित सर्वच जण भारावले.
..अन् उन्हाच्या झळा शीतल झाल्या!
चित्रकार सुहास बहुळकर यांनी लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष खा. विजय दर्डा यांच्या पहिल्या भेटीच्या गोड स्मृतींना उजाळा दिला. ते म्हणाले, मी चित्रकोशाचे काम करत असताना त्यांनी भेटण्यास बोलाविले होते. मात्र व्यग्र असल्यामुळे भेटू शकलो नाही. काही महिन्यांनंतर भेट घडून आली. त्यावेळेस, 1976 साली ‘सत्यकथा’मध्ये आलेली कविता तुमचीच का, अशी विचारणा मी केली. तेव्हा दर्डा यांनी ‘हो, मीच तो’ असे सांगितले. या पहिल्या भेटीनंतर दर्डा परिवाराशी स्नेह जुळला, आणि तो आजही टिकून आहे. नागपूरमध्ये एकदा भर उन्हाळ्य़ात दर्डा यांच्या भेटीस गेलो होतो, तेव्हा ‘उन्हाच्या झळा गप्पांनी शीतल झाल्या’ अशीही आठवण त्यांनी सांगितली.
सन्मान ‘त्यांचा’!
लोकमत ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकासाठी योगदान दिलेल्या काही निवडक व्यक्तींचाही सन्मान या सोहळ्य़ात खा. विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आला. यात ‘ट्रक नही, ये तो दुल्हन है हमारी’ या लेखाची लेखिका कलासमीक्षक शर्मिला फडके , ‘चेंचू’चे लेखक सुधीर लंके, ‘कुंभ’च्या लेखिका मेघना ढोके , ‘अब लडने में मजा आ रहा है’चे लेखक समीर मराठे यांचा समावेश आहे. शिवाय, अहमदनगरचे वृत्तपत्र विक्रेते
सुभाष भांड यांनाही सन्मानित करण्यात आले.
गुलजार हे दीपोत्सवचे प्रेरणास्त्रोत - विजय दर्डा
दीपोत्सव हा फक्त अंक नाही तर उत्सव आहे. मराठीमध्ये दिवाळी अंकांची खूप मोठी परंपरा आहे. मराठी भाषा, माणूस इतका समृद्ध आहे, तरीही या दिवाळी अंकांचा खप 1क् ते 12 हजारांच्या पुढे जात नाही. याची मनात खंत होती. बंगालमध्ये दुर्गापूजेच्या काळात निघणा:या अंकांचा खप खूप असतो, अशी भावना लोकमत समूहाचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली.
अकरा-बारा वर्षापूर्वी एका संध्याकाळी मी गुलजार यांच्या सोबत गप्पा मारत बसलो होतो, तेव्हा त्यांना मी म्हटले की, ‘मेरा सामान मुङो लौटा दो.’ यावेळी गुलजार यांनी मला विचारले होते, ‘सचमूच ले जाना चाहते हो? तो मांग लो..’, मराठीत दिवाळी अंक पुढे कसा न्यायचा, हा विचार तुम्ही लिहून द्या. तुम्ही या अंकाचे संपादन केले तर हे नक्कीच शक्य आहे, असे मी गुलजार यांना सांगितले. गुलजार साहेब यांचा अधिक संबंध उर्दूशी असल्याने ते मराठी दिवाळी अंकाचे संपादन कसे करणार, हा प्रश्न माङया सहका:यांना पडला. काहींना तर ते अवघडच वाटले, गुलजार हे नावापुरते संपादन करणार असतील, असेही काहींना वाटून गेले. मात्र त्यांनी अंकासाठी कोणता कागद वापरायचा, शाई कुठली वापरायची, मुखपृष्ठासाठी कोणता कागद वापरायचा, मुखपृष्ठावर कोणते चित्र असावे, या सगळ्य़ा गोष्टींचा त्यांनी विचार केला. प्रत्येक गोष्टीत त्यांचा सहभाग होता. चित्र ठरवण्यासाठी ते 4 दिवस नागपूरला येऊन राहिले होते. यातून दीपोत्सव अंकांची सुरुवात झाली. गुलजार यांनी 5 वर्षे या अंकाचे संपादन केले होते. ‘जिथे मराठी, तिथे लोकमत’ हा मंत्र मानून दीपोत्सव लंडन, अमेरिकेर्पयत पोहचला. तिथे अंक किती पोहचतो, यापेक्षा मराठीचा सन्मान परदेशात होतो याला महत्त्व असल्याचे दर्डा म्हणाले. दीपोत्सवच्या माध्यमातून तिथे उत्सव साजरा होतो. हा क्षण म्हणजे माङया वडिलांना खरी श्रद्धांजली आहे, असेही त्यांनी सांगितले.
मी अजूनही वडापावच खातो -मधुर भांडारकर
प्रख्यात दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. भांडारकर यांनी यावेळी दिवाळीच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, त्यावेळेची दिवाळी खूप वेगळी होती. 1क् ते 12 दिवस आधीपासून तयारी सुरू व्हायची. दिवाळीत मी त्यावेळी खूप फटाके फोडायचो. कंदील तयार करण्यासाठी, रांगोळी, रंगांची तयारी आम्ही सगळे मिळून एकत्रच करायचो. आधी आवाजाचे फटाके फोडायचो. मात्र, आता ध्वनिप्रदूषण आणि इतर गोष्टींचा विचार करून असे काहीच करत नाही. मी अजूनही सामान्यच असून मला भूक लागली की, अजूनही वडापाव खाणो पसंत करतो, असे म्हटल्यावर उपस्थितांनी त्यांना दाद दिली.
भांडारकर पुढे म्हणाले की, सुरुवातीच्या काळात मी खूप स्ट्रगल केला. व्हिडीओ कॅसेटची लायब्ररी चालवली. यावेळी मी घरोघरी जाऊन कॅसेट देऊन यायचो. हा व्यवसाय म्हणजे खरे तर, सहावी नापास झाल्याची शिक्षा होती. मला दिग्दर्शक व्हायचे होते. मात्र इंडस्ट्रीमध्ये कोणीच ओळखीचे नव्हते. खूप ठिकाणी सहाय्यक म्हणून काम केले. चांदनी बार ते हिरोईन हा खूप मोठा प्रवास आहे. 1999 मध्ये मी एक त्रिशक्ती नावाचा चित्रपट काढला होता. तो चालला नाही, यानंतर मी स्त्रीशक्तीकडे वळलो. चांदनी बार हा चित्रपटामुळे खूप मोठा बदल झाला. मला विजय आनंद, जब्बार पटेल, व्ही. शांताराम,
विमल रॉय, मणिरत्नम यांचे चित्रपट आवडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
भांडारकर यांचे ‘गाइड’प्रेम
एकदा रात्री मी घरी आल्यावर केबलवर गाईड हा चित्रपट सुरु होता. मी हा चित्रपट पाहायला बसलो. रात्रीचा एक वाजला होता. सुमारे तासाभराने केबल गेली. मग मी माङया बेडरूममध्ये गेलो आणि लाईट लावून गाईडची कॅसेट शोधत होतो. माङया बायकोने मला विचारले, रात्री दोन वाजता काय करतोयस? मी म्हटले, केबल गेल्यामुळे गाईड अर्धवट बघता आला. आता तो पूर्ण पाहायचा आहे, म्हणून मी कॅसेट शोधतो आहे. यानंतर मी तो चित्रपट पूर्ण पाहिला. (प्रतिनिधी)
मेलिंडा यांची प्रेरणादायी दीर्घ मुलाखत
मेलिंडा गेट्स यांना बिल गेट्स यांनी लग्नाविषयी विचारले, तेव्हा त्या होकार देताना मला भीती वाटते असे त्यांनी सांगितले होते. तू क्षणाला कोटय़वधी कमावतो, मी पैशांसाठी तुङयाशी लग्न करणार नाही. कमवलेल्या पैशाचा उपयोग कसा करशील, असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर बिल गेट्स यांनी उत्तर दिले होते, नवनवीन काहीतरी करणो हे माङो पॅशन आहे, पैसा हे त्याचे बायप्रोडक्ट आहे. मेलिण्डा या जगभर फिरल्या. त्यांनी प्रत्येक ठिकाणचे प्रश्न जाणून घेतले. यवतमाळ येथे त्यांनी आम्हाला 1क्क् संगणक दिले. यानंतर आम्ही लॅब तयार केल्या. यामुळे दहावी पास झालेल्यांना तिथे प्रशिक्षण मिळाले आणि ते तरूण 1क् ते 15 हजार रुपये कमवत आहेत. मेलिंडा यांनी सांगितले आहे, मी, बिल गेट्स हे जग सोडून जाऊ तोवर आम्ही 1क्क् बिलियन्स डॉलरचा सदुपयोग केलेला असेल. इंग्रजी वगळता अन्य कोणत्याही भाषेतील ही दीर्घ मुलाखत वाचकांना प्रेरणादायी ठरेल, असेही विजय दर्डा यांनी मनोगतात सांगितले.
पोलिसांच्या प्रश्नांसाठी ‘लोकमत’चा पुढाकार
दीपोत्सव प्रकाशन सोहळ्य़ाला पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील, मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ते आणि उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांची खास उपस्थिती होती. लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष, खा. विजय दर्डा यांनी त्यांच्या भाषणात पोलिसांच्या समस्यांविषयी आर्वजून उल्लेख केला. आपण स्वत: लेखन करून वारंवार पोलिसांची व्यथा मांडली असून लोकमतही पोलिसांच्या समस्यांसाठी आग्रही आणि ठाम भूमिका घेत असल्याचे त्यांनी सांगितले. आपण पोलीस खात्याला खूप मानणारे असून सण-उत्सव न पाहता पोलीस दल नेहमीच कार्यरत असल्याचे दर्डा यांनी सांगितले. पोलिसांना कुटुंबालाही वेळ देता येत नाही. पोलिसांचे प्रश्न, त्यांच्या वेतनाविषयीचे प्रश्न ह्यलोकमतने सतत मांडले असून शासनाने त्यांच्या वेतनाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, यासाठी ह्यलोकमत सतत पाठपुरावा करत आहे. पोलिसांच्या सामाजिक उत्तरदायित्वाबद्दल दर्डा यांनी पोलीस दलाचे आभार मानले.