यंदा थर्टी फर्स्टचे सेलीब्रेशन एक सेकंद जास्त !

By admin | Published: July 12, 2016 04:10 AM2016-07-12T04:10:22+5:302016-07-12T04:11:28+5:30

नव्या म्हणजे २०१७ या वर्षाचे आगमन एक सेकंद उशिराने होणार असल्याने यंदा थर्टी फर्स्टचे सेलीब्रेशन सेकंदभर का होईना, पण जास्त रंगणार आहे.

Celebrations of Thirty First this one more seconds! | यंदा थर्टी फर्स्टचे सेलीब्रेशन एक सेकंद जास्त !

यंदा थर्टी फर्स्टचे सेलीब्रेशन एक सेकंद जास्त !

Next

मुंबई : नव्या म्हणजे २०१७ या वर्षाचे आगमन एक सेकंद उशिराने होणार असल्याने यंदा थर्टी फर्स्टचे सेलीब्रेशन सेकंदभर का होईना, पण जास्त रंगणार आहे. २०१६ हे लीप वर्ष असून, ३१ डिसेंबर रोजीदेखील ‘लीप सेकंद’ पाळण्यात येणार आहे.
त्यामुळे २०१६ हे वर्ष एका सेकंदाने आणखी लांबणार असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
टायडल फोर्समुळे आणि इतर कारणांमुळे पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग मंदावत आहे. त्यामुळे अगदी अचूक वेळ दाखविणाऱ्या आधुनिक आण्विक घड्याळांची वेळ आणि प्रत्यक्ष पृथ्वीची स्थिती यामध्ये फरक पडू लागतो.

काय आहे योजना?
यंदा ३१ डिसेंबर रोजी लीप सेकंद धरण्यात येणार असल्याचे यू. एस. नेव्हल वेधशाळेचे डॉ. जेआॅफ चेस्टर यांनी नुकतेच जाहीर केले. १९७२पासून या वर्षापर्यंत एकूण २७ वेळा लीप सेकंद पाळले गेल्याचेही सोमण यांनी सांगितले. यापूर्वी ३० जून २०१५ रोजी लीप सेकंद धरण्यात आला होता.

हा फरक वाढला की मग आण्विक घड्याळांच्या वेळेत ३० जून किंवा ३१ डिसेंबर रोजी एक सेकंद वाढवून पृथ्वीची स्थिती आणि आण्विक घड्याळांतील वेळ यात मेळ घातला जातो. यालाच ‘लीप सेकंद’ असे म्हणतात.
- सोमण

Web Title: Celebrations of Thirty First this one more seconds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.