महाराष्ट्रातील चार नवीन बंदरांना केंद्राची मंजुरी
By Admin | Published: July 24, 2014 01:52 AM2014-07-24T01:52:33+5:302014-07-24T01:52:33+5:30
केंद्र सरकारने बुधवारी महाराष्ट्रातील चार नवीन बंदरांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. देवगड (आनंदवाडी), करंजा, अर्नाळा, मिरकर वाडा यांचा त्यात समावेश आहे.
राजेश सैनी - नवी दिल्ली
केंद्र सरकारने बुधवारी महाराष्ट्रातील चार नवीन बंदरांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. देवगड (आनंदवाडी), करंजा, अर्नाळा, मिरकर वाडा यांचा त्यात समावेश आहे. शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कृषी आणि उद्योगमंत्री संजीवकुमार बालियान यांनी ही माहिती दिली.
बालियान म्हणाले, महाराष्ट्र सरकारला देवगड, करंजा, अर्नाळा, मिरकरवाडा या बंदरांच्या योजनेसाठी 23,727 लाख रुपये दिले आहेत. त्याचबरोबर मुंबई मासेमारी बंदर हे कृषी मंत्रलयाच्या शंभर टक्के निधीतून विकसित केले आहे. आतार्पयत यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टला 13क्1.51 लाख रुपये दिले आहेत, असेही बालियान यांनी सांगितले. बंदरांचे व्यवस्थापन व्यावसायिकदृष्टय़ा चालविण्यासाठी सध्या मुंबई पोर्ट ट्रस्टला योजनेचा आराखडा तयार करायला सांगण्यात आला असून, संस्थात्मक प्रणाली सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. या संदर्भातच राज्य सरकारने मासेमारी बंदरांचे आधुनिकीकरण करण्यासंदर्भात केंद्रीय किनारा अभियांत्रिकी संस्थेकडून एक अहवाल तयार करून घेतला होता. या अहवालानुसारच बंदरांच्या स्थितीत सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
पोर्ट ट्रस्टला अजून गुंतवणुकीचा आराखडा तयार करायचा आहे. तसेच बंदरांचे व्यवस्थापन व्यावसायिकपणो चालवण्यासाठी अंतर्गत प्रणाली विकसित करणो अजून शिल्लक आहे. मात्र, यासाठी किती कालावधी लागेल, हे सांगणो कठीण आहे.