ठाणे-भिवंडी आठ पदरी रस्त्याला केंद्राची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:55 AM2017-08-02T04:55:44+5:302017-08-02T04:55:50+5:30

ठाणे-भिवंडी रस्ता आठ पदरी करण्याच्या एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी मंजुरी दिली.

Center approves the Thane-Bhiwandi Eight Road Road | ठाणे-भिवंडी आठ पदरी रस्त्याला केंद्राची मंजुरी

ठाणे-भिवंडी आठ पदरी रस्त्याला केंद्राची मंजुरी

Next

शीलेश शर्मा ।
नवी दिल्ली : ठाणे-भिवंडी रस्ता आठ पदरी करण्याच्या एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी मंजुरी दिली. मंगळवारी मंजूर झालेल्या योजनांत औरंगाबाद-जळगाव-जालना मार्गाचाही समावेश आहे. सातारा-कागल रस्ता सहापदरी करण्याच्या तीन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पालाही त्यांनी मान्यत दिली आहे.
महाराष्ट्रातील खासदारांशी चर्चा करताना गडकरी यांनी स्पष्ट केले की ठाणे-भिवंडी आठपदरी रस्त्याच्या निविदा काढण्याचे काम १५ दिवसांत पूर्ण केले जाईल व तीन महिन्यांत कामाला प्रारंभही होईल. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री मदन एरावार, खासदार संजय धोत्रे, धनंजय महाडिक, चंद्रकांत खैरे, संजय जाधव, श्रीरंग वारणे, श्रीकांत शिंदे, राजीव सातव आणि मंत्रालय सचिव युद्धवीर सिंह मलिक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, कल्याण-ठाणे-मुंबई जलमार्गासाठी लवकरच निविदा काढण्यात येतील. त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रारंभी ५०० कोटी रुपयांची निविदा काढली जाईल. या कामासाठी केंद्र आणि महापालिका एक-एक हजार कोटी रुपये खर्च करतील.
४५ हजार कोटींची कामे सुरू-
बैठकीत टोल आणि टोलनाक्यांचा प्रश्नही उपस्थित झाला. त्यावर नितीन गडकरी यांनी सांगितले की, ७५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांत ६५ हजार कोटी रुपयांच्या कामांना मान्यता दिलीआहे व त्यातील ४५ हजार कोटी रुपयांच्या कामांना प्रारंभही झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गासाठी १८ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
कामे वेगात होणार
कोल्हापूरचा कागल-सातारा मार्ग सहापदरी करण्यासाठी महाराष्ट्र विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातील तांत्रिक विसंगतींनाही दूर केल्या आहेत. रस्त्याचे काम तीन महिन्यांत सुरू केले जाईल व निविदांचे काम महिन्याभरात पूर्ण केले जाईल. औरंगाबाद-जळगाव-जालना मार्गाचे कामही मंजूर करण्यात येत असून प्रकल्पांची कामे वेगात पूर्ण होतील.

Web Title: Center approves the Thane-Bhiwandi Eight Road Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.