‘ए दिल...’च्या प्रदर्शनास केंद्र, राज्याचे आश्वासन

By admin | Published: October 21, 2016 03:27 AM2016-10-21T03:27:05+5:302016-10-21T03:27:05+5:30

‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटाच्या प्रदर्शनात कोणताही अडथळा येऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने चित्रपटाच्या निर्मात्यांसह करण जोहर

Center for the exhibition of 'A heart ...', the assurance of the state | ‘ए दिल...’च्या प्रदर्शनास केंद्र, राज्याचे आश्वासन

‘ए दिल...’च्या प्रदर्शनास केंद्र, राज्याचे आश्वासन

Next

नवी दिल्ली/ मुंबई : ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटाच्या प्रदर्शनात कोणताही अडथळा येऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने चित्रपटाच्या निर्मात्यांसह करण जोहर यांना गुरुवारी दिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या चित्रपटात फवाद खान हा पाकिस्तानी कलावंत असल्यामुळे प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, अशी धमकी दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोहर, चित्रपटाचे निर्माते आणि चित्रपटसृष्टीतील शिष्टमंडळाशी स्वतंत्रपणे झालेल्या बैठकीत चित्रपट प्रदर्शित होण्यास अडथळा येऊ दिला जाणार नसल्याचे आश्वासन दिले. चित्रपट २८ आॅक्टोबर रोजी प्रदर्शित होईल. फिल्म अँड टेलिव्हीजन प्रोड्युसर्स गिल्ड आॅफ इंडियाचे अध्यक्ष मुकेश भट्ट व निर्माते अपूर्व मेहता यांच्यासह शिष्टमंडळाने ाासाठी राजनाथ सिंह यांची भेट घेतली.

Web Title: Center for the exhibition of 'A heart ...', the assurance of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.