‘केंद्र सरकार शेतकरी, महाराष्ट्रविरोधी’

By admin | Published: October 2, 2014 01:30 AM2014-10-02T01:30:38+5:302014-10-02T01:30:38+5:30

केंद्र सरकार हे शेतकरी आणि महाराष्ट्रविरोधी आहे. मुंबईचा हिरे बाजार, समुद्रकाठावरील पोलीस ट्रेनिंग सेंटर आदी प्रकल्प मोदी गुजरातमध्ये नेत आहेत,

'Center Government Farmers, Anti-Maharashtra' | ‘केंद्र सरकार शेतकरी, महाराष्ट्रविरोधी’

‘केंद्र सरकार शेतकरी, महाराष्ट्रविरोधी’

Next
भुसावळ/चाळीसगाव : केंद्र सरकार हे शेतकरी आणि महाराष्ट्रविरोधी आहे. मुंबईचा हिरे बाजार, समुद्रकाठावरील पोलीस ट्रेनिंग सेंटर आदी प्रकल्प मोदी गुजरातमध्ये नेत आहेत, असे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भुसावळ व चाळीसगाव येथील प्रचार सभांमध्ये सोडले.
भुसावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अॅड. राजेश झाल्टे यांची बुधवारी प्रचारसभा झाली. राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या माजी मंत्री संजय सावकारे यांच्यावर त्यांनी नाव न घेता टीका केली. ज्याला निवडून आणले, शक्ती दिली, अधिकार दिले आणि मानाचे पद दिले, त्यांनी सामान्यांसाठी सत्तेचा वापर केला नाही. ज्यांना जनतेविषयी बांधिलकी नाही अशांना त्यांची जागा दाखवावी लागेल, असे पवार म्हणाले. ज्यांनी पाच वर्षे एकासोबत संसार केला आणि नंतर दुसरा संसार थाटला, हे वागणो बरे नाही असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राची जपणूक व हितासाठी चांगला निर्णय घ्या, महाराष्ट्र, देशाला शक्ती देणारे राज्य आहे. राष्ट्रवादीला संधी द्या. महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी चांगल्या चेह:याला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी) 

 

Web Title: 'Center Government Farmers, Anti-Maharashtra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.