CoronaVirus News: कोरोनाचा वाढता कहर; मोदी सरकारनं महाराष्ट्रासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 02:57 PM2021-02-24T14:57:30+5:302021-02-24T15:01:41+5:30

CoronaVirus News: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ; महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक

center now eyes on deteriorating conditions from corona left multi disciplinary high level teams for effected states | CoronaVirus News: कोरोनाचा वाढता कहर; मोदी सरकारनं महाराष्ट्रासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

CoronaVirus News: कोरोनाचा वाढता कहर; मोदी सरकारनं महाराष्ट्रासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

googlenewsNext

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. यामध्ये राज्यातील कोरोरा रुग्णांचा आकडा मोठा आहे. महाराष्ट्रासोबतच आणखी काही राज्यांमध्येही कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकार सतर्क झालं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यांना कोरोना संकट रोखण्यास मदत होणार आहे. (CoronaVirus in India)

सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरण खुले होणार? सरकार अधिकृत घोषणा करण्याची शक्यता 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या राज्यांमध्ये केंद्रानं उच्च स्तरीय पथकं पाठवली आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी ७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्रदेखील लिहिलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना केंद्राकडून महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश आणि जम्मू-काश्मीरला करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याचे आदेशदेखील  केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिले आहेत. 

...म्हणून सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण 95 टक्के; जनुकीय रचना बदलतेय

देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १३ हजार ७४२ नवे रुग्ण आढळून आले. यापैकी साडे ६ हजार २१८  रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. काल देशात कोरोनामुळे १०४ जणांचा मृत्यू झाला. त्यातले ५१ जण महाराष्ट्रातले आहेत. त्यामुळेच केंद्रानं महाराष्ट्रात उच्च स्तरीय पथक पाठवलं आहे. महाराष्ट्रासोबतच केरळ, पंजाब, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीरमध्येही पथकं रवाना करण्यात आली आहेत. 

Web Title: center now eyes on deteriorating conditions from corona left multi disciplinary high level teams for effected states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.