“केंद्राने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी”; पूजा खेडकर प्रकरणी शरद पवारांची स्पष्ट प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 03:43 PM2024-07-20T15:43:14+5:302024-07-20T15:44:21+5:30

Sharad Pawar News: मोहन भागवत यांनी केलेल्या एका विधानावर शरद पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, याची नोंद शहाण्या माणसांनी घ्यावी, असे म्हटले आहे.

center should take serious note and take action sharad pawar clear reaction in pooja khedkar case | “केंद्राने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी”; पूजा खेडकर प्रकरणी शरद पवारांची स्पष्ट प्रतिक्रिया

“केंद्राने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी”; पूजा खेडकर प्रकरणी शरद पवारांची स्पष्ट प्रतिक्रिया

Sharad Pawar News: बनावट ओळख देऊन नागरी सेवेत रुजू होण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पूजा खेडकर यांच्या विरोधात शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना केंद्राने गंभीर दखल घ्यावी, असे म्हटले आहे. 

प्रशिक्षणादरम्यान अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप पूजा यांच्यावर आहे. पूजा यांनी त्यांचे, आई- वडिलांचे नाव, स्वतःचे छायाचित्र, स्वाक्षरी, ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक, पत्ता हे सारे बदलले. स्वतःची खोटी ओळख देऊन परीक्षा प्रक्रियेत फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असल्याचे 'यूपीएससी'ने एका निवेदनात म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

केंद्राने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी

जी माहिती घेतली, ती देशाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. आपल्या देशात आणि राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक परंपरा आहे. त्या चौकटीच्या बाहेर अधिकारी जायला लागले, ही अतिशय गंभीर बाब आहे. केंद्र सरकार याला अतिशय गांभीर्याने दखल घेतील, योग्य ती कारवाई करतील, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

भाजप आणि आरएसएसचेच लोक वक्तव्य करायला लागले आहेत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी झारखंडमध्ये बोलताना, जो मनुष्य आहेत. पण त्यांच्यात मानवता नाही. या लोकांनी आधी खरे मनुष्य बनले पाहिजे. काही लोक मानव असताना सुपरमॅन बनू पाहतात. अलौकिक शक्ती असल्याचे म्हणत ते अलौकिक बनू पाहतात. पण तो तिथेच थांबत नाही. त्याला वाटते आपण देव बनले पाहिजे. पण देवता म्हणतात की, भगवान आमच्यापेक्षा जास्त मोठे आहेत. तर मग तो मनुष्य भगवान बनू इच्छितो. आता हे लोक इथे थांबणार आहेत की त्यापुढेही कुठे जायचे आहे, असे म्हटले होते. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. मोहन भागवत यांनी काय म्हटले, याची मला कल्पना नाही. ते कोणाबद्दल बोलले असावेत. आता देव बनायला कोणीतरी निघाले होते. त्यावर भाजप आणि आरएसएसचेच लोक वक्तव्य करायला लागले आहेत. याची नोंद शहाण्या माणसांनी घ्यावी, असे शरद पवार म्हणाले.
 

Web Title: center should take serious note and take action sharad pawar clear reaction in pooja khedkar case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.