दुष्काळी भागातील सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राचे पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2016 04:46 AM2016-11-05T04:46:22+5:302016-11-05T04:46:22+5:30

दुष्काळप्रवण भागात सिंचनाच्या कामांना गती देण्यासंदर्भातील महाराष्ट्राच्या प्रस्तावांस केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे

Center support for drought-hit irrigation projects | दुष्काळी भागातील सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राचे पाठबळ

दुष्काळी भागातील सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राचे पाठबळ

Next


मुंबई : दुष्काळप्रवण भागात सिंचनाच्या कामांना गती देण्यासंदर्भातील महाराष्ट्राच्या प्रस्तावांस केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. याबाबतच्या कार्यवाहीस केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन शुक्रवारी नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीत जेटली यांनी दिले.
वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीची प्रक्रि या अंतिम करताना जकातीबाबत राज्यांसाठी सुलभ धोरण निश्चित केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. राज्यातील दुष्काळप्रवण भागात सिंचनाच्या कामांना गती देण्यासाठी यावेळी प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले.
अर्थमंत्र्यांसोबतच्या या भेटीत मुख्यमंत्र्यांनी जीएसटीसंबंधित विविध विषयांवर चर्चा केली. या कराची अंमलबजावणी करताना राज्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्यासंबंधात निर्माण झालेल्या विविध प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी जेटली यांचे लक्ष वेधले.
या कराच्या आकारणीत पारदर्शकतेच्या माध्यमातून सुसंगती आणण्यासह संबंधित अधिनियमातील दंड संहिता विषयक तरतुदींची तीव्रता कमी करण्यात यावी, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)
>निति आयोगाच्या उपाध्यक्षांची भेट
कृषी-पणन क्षेत्रातील कामगिरीसह कृषीस्नेही सुधारणांमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरल्याबद्दल निति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगरिया यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले. ‘इज आॅफ डुर्इंग बिझनेस’ अंतर्गत मानांकन निश्चित करताना महाराष्ट्राने सुचिवलेले सात मुद्दे समाविष्ट न करण्याबाबतच्या निर्णयाचा निति आयोगाने फेरविचार करावा, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.
>प्रधान सचिवांशी चर्चा : राज्यांमधील पायाभूत विकासाच्या मोठ्या प्रकल्पांसाठी जागतिक वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी असलेली प्रक्रि या अधिक सुलभ करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्याशी चर्चा केली.

Web Title: Center support for drought-hit irrigation projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.