किल्ले संवर्धनासाठी केंद्राची मदत घेणार
By admin | Published: January 22, 2016 03:52 AM2016-01-22T03:52:17+5:302016-01-22T03:52:17+5:30
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासंदर्भात केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्याशी चर्चा झाली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्व्हेने राज्य पुरातत्त्व विभागाशी सामंजस्य करार करावा म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत
अलिबाग : ‘राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासंदर्भात केंद्रीय पुरातत्त्व मंत्री महेश शर्मा यांच्याशी चर्चा झाली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्व्हेने राज्य पुरातत्त्व विभागाशी सामंजस्य करार करावा, म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. रायगड महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
‘रायगड किल्ल्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी जाहीर झालेल्या निधीच्या दीडपट जादा निधी देण्यात येईल आणि पायथ्याशी असलेल्या पाचाड गावातील तलावांचे जलयुक्त शिवार योजनेतून पुनरुज्जीवन करण्यात येईल,’ अशी घोषणा फडणवीस यांनी केली. ‘या महोत्सवामुळे रायगडावरील पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल,’ असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.
रायगडावरील राणीवसा, पालखी दरवाजा, होळीचा माळ, बाजारपेठ, जगदीश्वराचे मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, नगारखाना, राजसदरेवरील मेघडंबरी या स्थळांना भेट देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शिवकालाचा अनुभव घेतला.