असंघटित कामगारांच्या ३० हजार घरांना केंद्र शासनाची मंजूरी

By admin | Published: May 27, 2016 02:08 PM2016-05-27T14:08:48+5:302016-05-27T14:10:51+5:30

पंतप्रधान आवास योजनेतंर्गत सोलापूरातील असंघटित कामगारांच्या ३० हजार घरांच्या रे नगर फेडरेशन च्या योजनेस केंद्र शासनाची मंजूरी मिळाली असल्याची माहिती माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिली़

Central Government Approval for 30,000 Unorganized Workers | असंघटित कामगारांच्या ३० हजार घरांना केंद्र शासनाची मंजूरी

असंघटित कामगारांच्या ३० हजार घरांना केंद्र शासनाची मंजूरी

Next
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
रे नगर फेडरेशन योजना :  खासगी तत्वावरील देशातील पहिला प्रकल्प, पंतप्रधान आवास योजनेतंर्गत होणार घरे,
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर, दि. २७ -  पंतप्रधान आवास योजनेतंर्गत सोलापूरातील असंघटित कामगारांच्या ३० हजार घरांच्या रे नगर फेडरेशन च्या योजनेस केंद्र शासनाची मंजूरी मिळाली असल्याची माहिती माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिली़
याबाबतची बैठक नवीदिल्ली येथील निर्माण भवन येथे शहरी व गरीबी निर्मुलन मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्रालयाच्या सचिवा डॉ़ नंदीता चटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झाली़ याच बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आडम मास्तर यांनी दिली़ या बैठकीस राज्य शासनाचे महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्रधिकरणचे उपाध्यक्ष संभाजी झेंडे, अभियान संचालक निर्मलकुमार देशमुख, मुख्य अभियंता लाड, मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे विभाग अशोक काकडे, कॉ़ आडम मास्तर, नलिनीताई कुलबुर्गी, अमोल मेहता, युसूफ शेख, दाऊद शेख यांच्यासह केंद्र व राज्य शासनाचे आयएसआय दर्जाचे १० ते १५ अधिकारी उपस्थित होते़
केंद्र शासनाच्या सर्वासाठी घरे २०२२ अंतर्गत पंतप्रधान आवास योजना राज्य शासनाने स्वीकार करून सोलापूरातील ३० हजार असंघटित कामगारांच्या घरांचा प्रस्ताव राज्य शासनाची मंजूरी व अनुदानाच्या सहभागासह राज्य शासनाच्या संनियत्रण समितीने केंद्र शासनाकडे पाठविला़ त्यानुसार केंद्र शासनाच्या शहरी व गरीबी मंत्रालयाने २९ एप्रिल २०१६ रोजी बैठक घेऊन प्रस्तावातील त्रुटीची पूर्तता करण्याबाबतच्या सुचना केल्या होत्या़ त्यानुसार शासनाने त्रुटीची पूर्तता करून राज्य शासनाने रे नगर फेडरेशन केल्यानंतर २६ मे २०१६ रोजी केंद्र शासनाच्या केंद्रीय स्तरीय सनियंत्रण समितीने प्रस्तावावर चर्चा करून प्रस्तावास मान्यता दिली़ भागीदारी तत्वावर परवडणारी घरे या गटातील पथदर्शी ठरणारा हा प्रकल्प सोलापूर शहराचा मानबिंदू ठरणार असल्याचेही आडम मास्तर यांनी सांगितले़ या पत्रकार परिषदेस नलिनीताई कलबुर्गी, युसूफ मेजर, अमोल मेहता, अ‍ॅड़ एम़एच़शेख आदी उपस्थित होते़
 
असा असेल प्रकल्प
सोलापूर - अक्कलकोट रोडवरील १८९ एकर जागवेर साकारण्यात येणाºया रे नगर येथे असंघटित कामगारांसाठी ३० हजार घरे बांधण्यात येणार आहेत़ यात एकूण ४०० इमारती उभारणार आहेत़ या इमारती ४ वर्षात पूर्ण करावयाच्या आहेत़ महिन्याला ९०० घरे पूर्ण करणाऱ ही योजना १८०० कोटीची आहे़ यात ३०० कोटी रूपये मुलभूत सेवासुविधा पुरविण्यांवर खर्च होणार आहेत़ यात केंद्र, राज्य व लाभार्थींचा हिस्सा असणार आहे़ 
आॅगस्टमध्ये होणार भूमिपूजन
या नव्या गृहप्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ केंद्रीय शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॉ़ सिताराम येचूरी, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी रणजितकुमार, मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्यासह अन्य केंद्रीय व राज्य शासनाच्या मंत्री, मंत्रालयातील सचिव आदींच्या हस्ते येत्या ऑगस्ट महिन्यात या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे.
 
या लोकांना मिळणार घरे
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत असंघटित कामगारांना घरे मिळणार आहेत़ यात प्रामुख्याने विडी कामगार, घरेलू कामगार, शिलाई, यंत्रमाग, बांधकाम, भाजीपाला विक्री करणारा, बांगड्या विकणारे, स्टेशनअरी विक्री, आईस्क्रीम विक्री, मेहंदी कोन तयार करणारे व विकणारे, ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, खासगी नोकरी, किराणा दुकान कामगार अशा ५६ हुन अधिक नोकºया व उद्योग करणारे, रोजच्या उत्पन्नावर घरे चालणाºया असंख्य असंघटित कामगारांना ही घरे मिळणार आहेत़ यासाठी लाभार्थ्यांचा हिस्सा हा ५० हजारांचा आहे़.
 
सोलापूरात जल्लोष
सोलापूरातील ३० हजार असंघटित कामगारांच्या योजनेस केंद्र शासनाची मान्यता मिळाल्याचे वृत्त सोलापूरात कळताच कामगारांनी एकच जल्लोष केला़ सकाळी पक्षाच्या कार्यालयात आडम मास्तर येताच कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात फटाक्याच्या अतीषबाजी करीत गुलालाची मुक्त उधळण केली़ .
 

Web Title: Central Government Approval for 30,000 Unorganized Workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.