पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चार पादचारी पूल बांधण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी

By admin | Published: June 23, 2017 03:17 PM2017-06-23T15:17:31+5:302017-06-23T15:17:31+5:30

-

Central government approval for constructing four fencing bridge on Pune-Solapur National Highway | पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चार पादचारी पूल बांधण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चार पादचारी पूल बांधण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर : - पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर एकूण चार ठिकाणी पादचारी पूल बांधण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी रस्ते,परिवहन,वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मडकी वस्ती,सोलापूर विद्यापीठ,लोंढे वस्ती जिल्हा परिषद शाळा आणि भिमानगर (उजनी ) आशा चार ठिकाणी पादचारी पूल होणार आहेत.
सोलापूर - पुणे या रस्त्याच्याया चौपदरीकरणामुळे सोलापूरच्या विकासाला गती मिळाली आहे.पूर्वी सोलापुरातून पुण्याला आणि पुण्याहून सोलापूरला येण्यासाठी जवळपास सहा ते साडेसहा तासांचा वेळ लागत होता.मात्र चार पदरी रस्ते झाल्यामुळे हे अंतर केवळ साडेतीन ते चार तासांवर आले आहे.
आयएलअँडएफएस या कंपनीमार्फत या महामागार्चे काम पूर्ण झाल्यानंतर वाहनांचा वेग वाढला ,परिणामी ब?्याच ठिकाणी नागरिक आणि विध्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे बनले होते.तसेच त्या ठिकाणी वारंवार छोटे-मोठे अपघात होऊन वाहतुकीला अडथळाही निर्माण होत होता.यासाठी तेथील स्थानिक नागरिकांनी पालकमंत्री देशमुख यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदने देऊन पादचारी पूल करण्याची वेळोवेळी मागणी केली होती.
दरम्यान पालकमंत्री देशमुख यांनी सदरच्या कामाचा प्रस्ताव तयार करून आणि त्याची वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता.केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन तातडीने पादचारी पूल करण्याची मागणीसुद्धा लावून धरली होती.त्यानुसार गडकरी यांनी नागरिक आणि विध्यार्थ्यांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा म्हणून पादचारी पुलाला मंजुरी दिली.या निर्णयामुळे वरील चारही ठिकाणच्या नागरिक आणि विध्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.सुमारे अंदाजे साडेतीन कोटी रुपये खर्चून पुढील सहा महिन्यात या पादचारी पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी स्वत: पालकमंत्री देशमुख संबंधित खात्याकडे पाठपुरावा करून लक्ष घालणार आहेत.
------------------------------------------------------
सुरक्षित रस्ता ओलांडण्यासाठी मोठी सोय
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामागार्मुळे वाहनधारक तसेच प्रवाशांची मोठी सोया झाली आहे.अत्यंत कमी वेळेत पुण्याला पोहोचणे शक्य झाले आहे.असे असताना या मार्गावरील महत्वाच्या ठिकाणचे नागरिक आणि विध्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा म्हणून तसेच अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी अनेकांनी पादचारी पुलांची मागणी केली होती.त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून पूल मंजूर करून घेतले आहेत.येत्या सहा महिन्यात चारही पूल तातडीने होण्यासाठी आपण पाठपुरावा चालू ठेवणार आहोत.या पुलामुळे अपघाताचे प्रमाण कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Central government approval for constructing four fencing bridge on Pune-Solapur National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.