“महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवाल तर परवाना रद्द करू”; मंत्री नवाब मलिकांचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 02:00 PM2021-04-17T14:00:19+5:302021-04-17T14:24:41+5:30
रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या १६ कंपन्यांना महाराष्ट्र सरकारनं विचारणा केली असता खळबळजनक माहिती समोर आली.
मुंबई – राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना रुग्णांना बेड्स उपलब्ध नाहीत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचं समोर येत आहे. पुण्यात शुक्रवारी रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केले. राज्यात अशी बिकट परिस्थिती असताना मंत्री नवाब मलिकांनी खळबळजनक दावा करत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.( Central Government has asked them not to supply the medicine to Maharashtra Says Nawab Malik)
मंत्री नवाब मलिकांनी ट्विट करत म्हंटलय की, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या १६ कंपन्यांना महाराष्ट्र सरकारनं विचारलं असता त्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषधं पुरवू नका असं सांगितल्याचा खळबळजनक दावा केला आहे. जर या कंपन्यांनी महाराष्ट्राला औषधं पुरवली तर त्यांचा परवाना रद्द करू अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.
It is sad & shocking that when Government of Maharashtra asked the 16 export companies for #Remdesivir, we were told that Central Government has asked them not to supply the medicine to #Maharashtra.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 17, 2021
These companies were warned, if they did, their license will be cancelled(1/2)
अशा धोकादायक परिस्थितीत रेमडेसिवीरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय महाराष्ट्र सरकारकडे कोणता पर्याय राहणार नाही. आपल्या देशात १६ निर्यातदारांकडून २० लाख कुपीचा वापर केला जातो.आता केंद्र सरकारकडून निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे ही औषधं देशात विकायला परवानगी मागितली असताना केंद्र सरकारने अद्याप त्यास नकार दिला आहे असं नवाब मलिकांनी सांगितले.
There are 16 export oriented units in our country that have 20 Lakh vials of #Remdesivir, since exports are now banned by the government, these units are seeking permission to sell this medicine in our country but central government is denying the same. (1/3)
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 17, 2021
दरम्यान, उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडूनच ते विकले जावे असं सरकारचं म्हणणं आहे. या ७ उत्पादन करणाऱ्या कंपन्या जबाबदारी घेण्यात नकार देत आहेत. संकटकाळी निर्णय घेणं अपेक्षित असतं. औषधांची आवश्यकता असताना आणि उपलब्धता आहे फक्त निर्णय घेण्याची गरज आहे. या समस्येचं निराकरण करून राज्यातील सर्व हॉस्पिटलला औषधांचा पुरवठा केला पाहिजे असंही नवाब मलिक म्हणाले.
भाजपानं आणला होता ५० हजार इंजेक्शनचा साठा
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात कोरोनावर गुणकारी ठरणाऱ्या रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटना देखील समोर आल्या आहेत. कोरोना साथ थोपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीयांना आवाहन केले होते. रेमडेसिवीरच्या पुरवठ्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी काही निर्यात करणाऱ्या औषध उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने दमण येथील ग्रुप फार्मा प्रा. लि. कंपनीशी चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दमणला धाव घेतली. दमणच्या भेटीनंतर महाराष्ट्रासाठी भाजपाकडून ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली होती.