केंद्र सरकार २५ हजार टन कांदा खरेदी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 04:37 AM2018-03-29T04:37:46+5:302018-03-29T04:37:46+5:30
कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भाव
मुंबई : कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भाव स्थिरीकरण योजनेतून २५ हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार चढ्ढा यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव व लासलगाव बाजार समितीत कांद्याची खरेदी केली जाणार असल्याने भाव स्थिर राहण्यास मदत होणार आहे. मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सुमारे ३२ हजार ९२० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर क्विंटलचे सरासरी भाव ८०६ रुपये होते. शुक्रवारी जिल्ह्यात ६०२ रुपये सरासरी भाव होते. कांद्याचे चांगले उत्पादन झाल्याने आवक वाढली आहे. आॅगस्ट ते डिसेंबर सरासरी दोन हजार रुपये असलेला भाव आता नाशिक जिल्ह्यातील घाऊक बाजारात क्विंटलमागे ६०० ते ७०० रुपयांवर आला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. नाफेडने किमान १५ हजार टन कांदा खरेदी करावा, अशा मागणीचे पत्र शेतकºयांच्या कृषी व पणन कंपन्यांचा (फार्मर प्रोड्युसर कंपनी) महासंघ असलेल्या ‘महा-एफपीसी’ संस्थेने दिले असल्याचेही चढ्ढा यांनी सांगितले. नाफेडकडून लवकरच कांदा खरेदीला सुरुवात होईल. तो माल दिल्ली व इतर राज्यांत पाठविला जाणार आहे.