केंद्रीय जलआयोगाची ‘मेडिगट्टा’ला मान्यता; महाराष्ट्र-तेलंगणचा संयुक्त सिंचन प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:32 AM2017-11-04T01:32:10+5:302017-11-04T01:32:33+5:30
महाराष्ट्र-तेलंगणच्या संयुक्त अशा मेडिगट्टा (कालेस्वरम) सिंचन प्रकल्पाच्या विस्तृत प्रकल्प अहवालास (डीपीआर) आज केंद्रीय जल आयोगाने मंजुरी दिली.
मुंबई : महाराष्ट्र-तेलंगणच्या संयुक्त अशा मेडिगट्टा (कालेस्वरम) सिंचन प्रकल्पाच्या विस्तृत प्रकल्प अहवालास (डीपीआर) आज केंद्रीय जल आयोगाने मंजुरी दिली.
या आंतरराज्यीय प्रकल्पाच्या करारावर २६ आॅगस्ट २०१६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी स्वाक्षºया केल्या होत्या.
या प्रकल्पाला जलऔष्णिक मंजुरी चार दिवसांपूर्वीच मिळाली होती. तसेच पर्यावरण मंत्रालयाने प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यास गेल्याच आठवड्यात तत्त्वत: मान्यता दिली होती. गोदावरी नदीवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांतील ३० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. प्रकल्पाचा खर्च तेलंगण सरकार करणार आहे.