मध्य रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचे हाल

By admin | Published: August 26, 2016 06:35 PM2016-08-26T18:35:09+5:302016-08-27T05:39:04+5:30

सातत्याने कोलमडणारी मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे.

Central Railway disrupted; | मध्य रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचे हाल

मध्य रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचे हाल

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई : दादर-माटुंगा दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना जलद मार्गावर घडली आणि डाऊन मार्गावरून जाणाऱ्या लोकलचा बोजवारा उडाला. दीड तासापेक्षाही जास्त वेळ रूळ दुरुस्त करण्यासाठी लागल्याने संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्यांचे हाल झाले. 
दादर ते माटुंगादरम्यान जलद मार्गावर संध्याकाळी ६.१0च्या सुमारास रेल्वे रुळाला तडा गेली. ही घटना घडताच जलद लोकल भायखळापासून धिम्या मार्गावरून वळविण्यात आल्या. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली; आणि रुळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. धिम्या लोकल आणि जलद लोकल एकाच मार्गावरून धावत असल्याने लोकलचा पुरता बोजवारा उडण्यास सुरुवात झाली. लोकल तब्बल अर्धा तासापेक्षा जास्त वेळ उशिराने धावत होत्या. त्यामुळे लोकल गाड्यांना प्रचंड गर्दी झाली. सीएसटी ते दादर असा लोकल प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 
एक तास मोजावा लागत होता. 
दरम्यान, दुरुस्तीचे काम हे रात्री ७.५४च्या सुमारास पूर्ववत करण्यात आले आणि जलद मार्गावरील लोकल सुरू करण्यात आल्या.

 

Web Title: Central Railway disrupted;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.