तांत्रिक कारणांमुळे मध्य रेल्वे विस्कळीत

By admin | Published: January 29, 2016 09:27 AM2016-01-29T09:27:50+5:302016-01-29T12:01:54+5:30

तांत्रिक कारणांमुळे मध्य रेल्वेच्या कर्जत व कसाराहून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना त्याचा चांगलाच फटका बसला.

Central Railway disrupts due to technical reasons | तांत्रिक कारणांमुळे मध्य रेल्वे विस्कळीत

तांत्रिक कारणांमुळे मध्य रेल्वे विस्कळीत

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - तांत्रिक कारणांमुळे मध्य रेल्वेच्या कर्जत व कसाराहून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांना त्याचा चांगलाच फटका बसला आहे. शुक्रवारी सकाळी आसनगाव स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने मुंबईच्या दिशेन येणा-या लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. ब-याच प्रयत्नांनंतर आता हे इंजिन ट्रॅकवरून बाजूला हटवण्यात यश आले असले तरी रेल्वेचे बिघडलेले वेळापत्रक पूर्ववत व्हायला आणखी थोडा वेळ लागेल. 
तर दुसरीकडे कर्जत-खोपोली मार्गावरील पळसदरी स्थानकाजवळ वीज पुरवठा खंडित झाल्यानेही खोपोली-कर्जत लोकलसेवा विस्कळीत झाली. याचा फटका सीएसटीच्या दिशेने येणा-या गाड्यांवरही झाला असून गाड्या २०-२५ मिनिटे उशीराने धावत आहेत. दरम्यान हा वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असून तोपर्यंत सर्व गाड्या केवळ कर्जतपर्यंतच चालवण्यात येणार आहेत.
त्यामुळे प्रत्येक स्थानकांवर व गाड्यांमध्येही बरीच गर्दी झाली असून चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत.
 
पश्चिम रेल्वेही झाली ठप्प
मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेवरही बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला. बोईसर - पालघरदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने डहाणूहून चर्चगेटच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली. तसेच गुजरातहून येणा-या मेल गाड्यांवरही परिणाम झाला.
 

Web Title: Central Railway disrupts due to technical reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.