तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे रखडली, कर्जत-कसारा मार्ग ठप्प

By admin | Published: April 16, 2016 10:14 AM2016-04-16T10:14:45+5:302016-04-16T11:53:46+5:30

तांत्रिक बिघाडामुळे शनिवारी सकाळी मध्य रेल्वेच्या कल्याण-कर्जत व कल्याण-कसारा या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

Central Railway drops due to technical difficulties, Karjat-Kasara route jam | तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे रखडली, कर्जत-कसारा मार्ग ठप्प

तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे रखडली, कर्जत-कसारा मार्ग ठप्प

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - तांत्रिक बिघाडामुळे शनिवारी सकाळी मध्य रेल्वेच्या कल्याण-कर्जत व कल्याण-कसारा या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. 
कल्याण-कसारा मार्गावरील वासिंद-आसनगाव स्थानकांदरम्यान शनिवारी सकाळी गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तर कल्याण-कर्जत मार्गावर कर्जत स्थानकाजवळ रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्याने तेथील वाहतुकीचाही बो-या वाजला. सकाळी ऐन गर्दीच्या वेळेस झालेल्या या खोळंब्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. अनेक स्थानकांवर तसेच गाड्यांमध्येही प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान सध्या गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनातील बिघाड दुरूस्त झाला आहे, मात्र गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत होण्यास अद्याप थोडा वेळ लागणार आहे.
 

Web Title: Central Railway drops due to technical difficulties, Karjat-Kasara route jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.