मध्य रेल्वेने उत्तर प्रदेश, बिहारसाठी गाड्या वाढवल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 03:04 AM2021-04-07T03:04:23+5:302021-04-07T03:04:51+5:30
कोरोनाच्या धास्तीने उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मजुरांनी गावची वाट धरली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या गाड्यांच्या संख्येत वाढ केली आहे.
मुंबई : कोरोनाच्या धास्तीने उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मजुरांनी गावची वाट धरली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या गाड्यांच्या संख्येत वाढ केली आहे.
त्यानुसार मुंबई-गोरखपूर स्पेशल विशेष गाडी १३ आणि २० एप्रिल रोजी एलटीटी येथून १६.४० वाजता सुटेल, तर पुणे-दानापूर विशेष अतिजलद विशेष गाडी ९, ११, १६ आणि १८ एप्रिल रोजी पुणे येथून १६.१५ वाजता सुटेल. मुंबई-पाटणा अतिजलद विशेष गाडी १२, १५ व १९ एप्रिल रोजी सीएसएमटी येथून ११.०५ वाजता सुटेल. मुंबई-गोरखपूर विशेष गाडी ७, १२, १४ व १९ रोजी सीएसएमटी येथून २३.३० वाजता सुटेल. मुंबई- दरभंगा अतिजलद विशेष गाडी १२ आणि १९ एप्रिल रोजी एलटीटी येथून ८.०५ वाजता सुटेल.
आरक्षित तिकीट असेल तरच प्रवास
विशेष गाड्यांसाठी ७ एप्रिलपासून आरक्षण करता येणार आहे. केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान कोरोनाशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.