मध्य रेल्वे अधिक गतिमान!
By admin | Published: December 22, 2014 04:02 AM2014-12-22T04:02:56+5:302014-12-22T04:02:56+5:30
सीएसटी ते ठाणे मार्गावर शनिवारी मध्य रेल्वेने घेतलेली डीसी-एसी चाचणी पूर्ण झाली असून, ती यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मुंबई : सीएसटी ते ठाणे मार्गावर शनिवारी मध्य रेल्वेने घेतलेली डीसी-एसी चाचणी पूर्ण झाली असून, ती यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे आता गाड्यांचा वेग वाढणार असून, वीजबचतही होणार आहे. त्याचबरोबर नव्या गाड्यांनाही हा बदल सोयीचा होणार आहे.
सीएसटी ते ठाणे अप आणि डाऊन जलद मार्गावर आणि सीएसटी ते मुंब्रा अप आणि डाऊन धीम्या मार्गावर डीसी (१,५00 व्होल्ट डायरेक्ट करंट) ते एसी (२५,000 व्होल्ट अल्टरनेट करंट) परावर्तनाची चाचणी मध्य रेल्वने २0 डिसेंबरच्या रात्री घेतली. त्यामुळे शनिवारी रात्री चाकरमान्यांना लवकरच पॅकअप करावे लागले होते.
आता रेल्वे सुरक्षा आयुक्तांना त्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. सुरक्षा आयुक्त याची पाहणी करतील. सध्या ठाण्यापर्यंत १,५00 डीसीवर लोकल धावत आहेत. यामुळे २५,000 एसीवर गाड्या धावतील. त्यामुळे वेग वाढेल. (प्रतिनिधी)