मध्य रेल्वे हळूहळू पूर्वपदावर, लोकलचा डबा रुळावरून घसरल्यानं झाली होती विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 03:54 PM2017-10-01T15:54:07+5:302017-10-01T16:46:47+5:30
मुंबई- मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल आज पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कर्जतला जाणारी लोकल दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी मशीद बंदर स्टेशनजवळ रुळावरून घसरली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वेचाही खोळंबा झाला आहे.
मुंबई- मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल हळूहळू पूर्वपदावर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कर्जतला दिशेनं जाणा-या लोकलचा एक डबा दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी मशीद बंदर स्टेशनजवळ रुळावरून घसरला होता. त्यामुळे मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वे विस्कळीत झाली होती. अखेर मध्य रेल्वे हळूहळू पूर्वपदावर येतेय. रुळावरून घसरलेल्या लोकलमध्ये 50 ते 60 जण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
लोकलचे रुळावरून घसरलेले डबे बाजूला हटवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. अखेर त्या प्रयत्नांना यश आलं आहे. लोकलच्या दुर्घटनेमुळे भायखळा ते सीएसएमटीदरम्यानची जलद मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. सीएसएमटी स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरून ही लोकल कर्जतच्या दिशेने निघाली होती. लोकलचा वेग मंदावला असतानाच अचानकपणे एक डबा रुळावरून घसरला होता. लोकलचा एक डबा रुळावरून घसरल्यामुळे सीएसएमटी ते भायखळादरम्यानची जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच धिम्या मार्गावरील वाहतूकही उशिरानं सुरू आहे.
#Visual: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus-Karjat local train derails in Mumbai. No injuries reported. pic.twitter.com/IffIwf6sAM
— ANI (@ANI) October 1, 2017