‘प्रीमियम’बाबत मध्य रेल्वे अंधारात
By admin | Published: September 4, 2014 02:29 AM2014-09-04T02:29:18+5:302014-09-04T02:29:18+5:30
प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद द्यावा, अन्यथा या ट्रेन बंद करण्याची धमकी देणा:या कोकण रेल्वेने मध्य रेल्वेला मात्र कुठलीही कल्पना न दिल्याचे समोर आले आहे.
Next
मुंबई : गणोशोत्सवानिमित्त कोकणात जाणा:या प्रीमियम ट्रेनला प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद द्यावा, अन्यथा या ट्रेन बंद करण्याची धमकी देणा:या कोकण रेल्वेने मध्य रेल्वेला मात्र कुठलीही कल्पना न दिल्याचे समोर आले आहे. शताब्दी, एसी डबल डेकर आणि एसी आरक्षित ट्रेन मध्य रेल्वेच्या असल्याने कोकण रेल्वे असे पाऊल कसे काय उचलू शकते, अशीच चर्चा मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिका:यांमध्ये सुरू होती. अशा प्रकारचे कुठलेही पत्र आमच्याकडे आले नसल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.
यंदा रेल्वेकडून गणोशोत्सवानिमित्त 200 पेक्षा अधिक गाडय़ा सोडण्यात आल्या असून यात 46 प्रीमियम ट्रेनचा समावेश आहे. 02003/4 शताब्दी एक्स्प्रेस, 02005/6 एसी डबल डेकर तर 02045/6 एसी आरक्षित ट्रेनचा यात समावेश असून 22 ऑगस्टपासून या ट्रेन धावत आहेत. मात्र प्रीमियम ट्रेन असल्याने मागणीनुसार त्याचे प्रवासभाडे वाढत आहे. त्यामुळे कोकणात जाणा:या चाकरमान्यांना परवडणारे नसून या तीनही ट्रेनकडे त्यांनी पाठ फिरवली आहे. 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर्पयत कोकणात जाणा:या चाकरमान्यांनी अल्प प्रतिसाद दिल्यामुळे ही बाब जिव्हारी लागलेल्या कोकण रेल्वेने तीनही ट्रेन बंद करण्याची धमकीच दिली. या ट्रेनला प्रतिसाद द्या, अन्यथा त्या बंद करण्याची धमकी प्रसिद्धिपत्रकाद्वारे देतानाच मध्य रेल्वेला मात्र कुठलीही कल्पना देण्यात आली नाही. या तीनही ट्रेन मध्य रेल्वेच्या असून, कोकण रेल्वे त्या बंद करण्याची धमकी कशी काय देऊ शकते, अशी चर्चा मध्य रेल्वेत रंगली होती. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, कोकण रेल्वेकडून कुठलेही पत्र मध्य रेल्वेला प्राप्त झालेले नाही. त्यांनी याबाबत मध्य रेल्वेशी चर्चा करणो गरजेचे होते. बहुतेक प्रवाशांनी या ट्रेनचा
जास्तीत जास्त लाभ घ्यावा हा कोकण रेल्वेचा उद्देश असेल. (प्रतिनिधी)
भोपाळ-इंदूर मार्गावर एसी डबल डेकर ट्रेन चालवण्यात आली होती. मात्र त्याला अल्प प्रतिसाद मिळाल्याने ही ट्रेन मुंबई-गोवा मार्गावर चालवण्याचा निर्णय घेतला. या मार्गावर गणोशोत्सवात प्रीमियम ट्रेनला अल्प प्रतिसाद मिळाला. या ट्रेनला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा म्हणून धमकी नाही, तर आवाहन करण्यात आल्याचे कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी स्पष्ट केले.
पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद अशी नियमित एसी डबल डेकर ट्रेन धावत असून या ट्रेनचे प्रवास भाडे 655 रुपये आहे. तर 5 ते 11 वयार्पयतच्या मुलांसाठी 375 रुपये, 58 वयाच्या पुढे प्रवाशांसाठी 375 आणि 60 पेक्षा जास्त वयासाठी 430 रुपये भाडे आहे. त्यामुळे एसी डबल डेकर आणि शताब्दी ट्रेन प्रीमियमपेक्षा नुसतीच स्पेशल ट्रेन म्हणून चालवली असती तर त्याचे प्रवासभाडे हे एकच राहिले असते.