राज्यात ११ ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेच्या ८ विशेष गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 03:25 AM2020-10-09T03:25:37+5:302020-10-09T06:50:55+5:30

कोरोनाचे नियम पाळून केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी

central railway will run 8 special trains in maharashtra from October 11 | राज्यात ११ ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेच्या ८ विशेष गाड्या

राज्यात ११ ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेच्या ८ विशेष गाड्या

Next

मुंबई : राज्यात ११ ऑक्टोबरपासून मध्य रेल्वे ८ विशेष गाड्या सुरू करणार आहे. मुंबई-कोल्हापूर, मुंबई-लातूर, पुणे-नागपूर, पुणे-अमरावती, कोल्हापूर- गोंदिया व मुंबई- नांदेड या मार्गांवर त्या धावतील. या गाड्यांमधून कोरोनाचे नियम पाळून केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी आहे.

११ ऑक्टोबरपासून कोल्हापूर-गोंदिया ही विशेष गाडी दररोज धावेल. ती परतीच्या प्रवासासाठीही उपलब्ध असेल. तर, ११ ऑक्टोबरपासून मुंबई-नांदेड विशेष गाडी दररोज धावेल. दुसऱ्या दिवशी ती नांदेड येथे पोहोचून मुंबईला रवाना होईल. ११ ऑक्टोबरपासून मुंबई-लातूर विशेष सुपरफास्ट आठवड्यात चार दिवस धावेल. ही विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर सोमवारी, मंगळवार, गुरुवार आणि रविवारी लातूरसाठी रवाना होईल. ही गाडी सोमवार, मंगळवार, बुधवार व शुक्रवारी परतीसाठी उपलब्ध असेल.

१२ ऑक्टोबरला कोल्हापूरहून मुंबईसाठी गाडी रवाना होईल. मुंबई-कोल्हापूर ही विशेष गाडी १३ आॅक्टोबरपासून रोज धावेल. ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कोल्हापूरसाठी रवाना होईल.
१५ ऑक्टोबरपासून पुणे-नागपूर एसी स्पेशल साप्ताहिक गाडी दर गुरुवारी पुणे येथून सोडण्यात येईल. नागपूर येथून दर गुरुवारी ही गाडी सोडण्यात येईल.
१७ ऑक्टोबरपासून पुणे-अजनी एसी स्पेशल साप्ताहिक गाडी दर शनिवारी पुणे येथून सोडण्यात येईल. तसेच अजनी येथून दर रविवारी ही गाडी पुण्यासाठी रवाना होईल. १३ ऑक्टोबरपासून अजनी-पुणे एसी स्पेशल साप्ताहिक दर मंगळवारी पुण्यासाठी सोडण्यात येईल. पुण्याहून अजनीसाठी दर गुरुवारी ही गाडी रवाना होईल.
१४ ऑक्टोबरपासून पुणे-अमरावती एसी स्पेशल साप्ताहिक गाडी बुधवारी पुणे येथून सोडण्यात येईल. अमरावती येथून दर गुरुवारी ती पुण्यासाठी रवाना होईल.

Web Title: central railway will run 8 special trains in maharashtra from October 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.