कॅशलेस व्यवहाराबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खातेदाराला केंद्राचे बक्षीस
By admin | Published: December 26, 2016 10:06 PM2016-12-26T22:06:25+5:302016-12-26T22:06:25+5:30
वाशिम शाखेचे एटीएम कार्डधारक राजेंद्र महादेवराव देशमुख यांची कॅशलेस व्यवहारासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या लकी ग्राहक योजनेत निवड झाली
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 26 - अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वाशिम शाखेचे एटीएम कार्डधारक राजेंद्र महादेवराव देशमुख यांची कॅशलेस व्यवहारासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या लकी ग्राहक योजनेत निवड झाली आहे. या अंतर्गत त्यांना एक हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
जनतेने अधिकाधिक व्यवहार कॅशलेस करण्याकरिता डेबिट/ क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड याचा वापर करावा म्हणून केंद्र शासनाने लकी ग्राहक योजना जाहीर केलेली आहे. या योजनेची सोडत दर दिवशी काढण्यात येत आहे. या योजनेंतर्गत विविध रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत राजेंद्र देशमुख यांनी केलेल्या व्यवहारामुळे त्यांची केंद्र शासनाच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती बँकेच्या वतीने सोमवारी देण्यात आली.
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दोन लाख पन्नास हजारावर रुपे केसीसी कार्ड आणि एटीएम कार्ड अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील ग्राहकांना वितरीत केली आहेत. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ग्राहकांकरिता बँकेने २५ डिसेंबर २०१६ ते २ जानेवारी २०१७चे कालावधीत एटीएम कार्डद्वारे पॉईज मशिनचे माध्यमातून केलेल्या खरेदीवर ०.५ टक्के रोख परतावा जाहीर केला आहे.