शताब्दी "आर्ट सोसायटी ऑफ इंडिया" ची ....

By admin | Published: April 6, 2017 05:29 PM2017-04-06T17:29:08+5:302017-04-06T17:29:08+5:30

चार समविचारी माणसांनी एकत्र येऊन एखाद्या चांगल्या उद्देशाने एखादी संस्था सुरु करावी हे काही नवं नाही.

Century "Art Society of India". | शताब्दी "आर्ट सोसायटी ऑफ इंडिया" ची ....

शताब्दी "आर्ट सोसायटी ऑफ इंडिया" ची ....

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - चार समविचारी माणसांनी एकत्र येऊन एखाद्या चांगल्या उद्देशाने एखादी संस्था सुरु करावी हे काही नवं नाही. यात सहभागी सदस्यांचा उत्साह सुरुवातीला खूप दांडगा असतो. संख्या पुरेशी असते. परंतू कालांतराने काही योग्य - अयोग्य कारणांनी या सर्व मुबलक गोष्टींत घट होऊ लागते. समुद्रात जशी एखादी लाट उसळून वर यावी व पुन्हा तिचा समुद्र व्हावा तशी ही संस्थाही शांत होते. यातही काही नविन नाही. अशा पार्श्वभूमीवर एखादी संस्था अव्याहतपणे एका विचाराने कार्यरत राहून स्वतःची शंभरी साजरी करते तेव्हा आपसूकच आदरयुक्त आश्चर्याने व कौतुकाने भुवया उंच होतात. 
 
"आर्ट सोसायटी ऑफ इंडिया" - चित्र व शिल्पकारांनी कलेच्या प्रसारासाठी, स्वदेशी कलाकारांना सक्षम मंच उपलब्ध करून देण्यासाठी १९१८ साली स्थापन केलेली हि संस्था आजही तितक्याच जोमाने कलाक्षेत्रात कार्यरत आहे व आपल्या शुभेच्छांनी आशीर्नादाने ती यापुढेही असेच भरीव कार्य करीत राहील यात शंका नाही.
 
यंदाचं हे वर्ष आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचं "शताब्दी वर्ष" आहे. हा आनंदाचा व अभिमानाचा कालावधी संस्थेचे आजी, माजी व भावी कलाकार, कलारसिक सभासद जल्लोषाने साजरा करणार नसतील तरच नवल. संस्थेशी सलग्न असलेल्या व नसलेल्या सर्व सर्व कलाकारांनी व रसिकांनी या आनंद सोहळ्यात सहभागी व्हावे असे नम्र आवाहन विद्यमान समिती या बातामिद्वारे करीत आहे.
या सोहळ्याची नांदी सोमवार दिनांक ३ एप्रिल रोजी लायन गेट जवळील अडोर हाउस, फोर्ट मुंबई येथील "आर्टिस्टस सेंटर"मधे, सालाबादप्रमाणे "आर्ट सोसायटी ऑफ इंडिया" ने वर्षभरात आयोजित केल्या गेलेल्या कार्याशालांमध्ये व्यावसायिक व हौशी सभासद कलाकारांनी साकारलेल्या चित्रकृतीनच्या प्रदर्शनआमध्ये झाली. हे प्रदर्शन सर्वांसाठी दि. ९ एप्रिल संध्या. ७ वाजेपर्यंत. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सन्माननीय सुप्रसिद्ध चित्रकार व कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री वासुदेवजी कामत व सचिव डॉ. गोपालजी नेने यांनी शताब्दी वर्षात आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची माहिती उपस्थितांत दिली. या कार्यक्रमांच्या भरगच्च यादीमध्ये वरील ठिकाणी सर्वात प्रथम तीन कार्यक्रम सदर केले जातील.
 
शुक्रवार, दिनांक ७ एप्रिल रोजी दु. ४ वा. सन्माननीय प्राध्यापक श्री निखील पुरोहित व श्री महेंद्र दामले यांचे "स्वातंत्र्योत्तर काळामधील दृश्य कलेतील प्रतिमांचे बदलते अर्थ" (Meaning of imagery in post colonial period) या विषयावरची चर्चा व स्लाईड शो च्या माध्यमातून रसिकांसाठी सदर केली जाईल. अत्यंत वेगळा विषय या निमित्ताने अभ्यासिला जावा असा "आर्ट सोसायटी ऑफ इंडिया" चा प्रयत्न आहे.
 
शनिवार, दिनांक ८ एप्रिल रोजी दु. ४ वा. सन्माननीय पत्रकार श्री विनायक परब यांचे "दृश्य कलेमधील सादरीकरण व विक्री" (Marketing strategy in visual art) या विषयावरचे व्याख्यान आयोजिित केले आहे. कलानिर्मितीविषयी अनेक चर्चा आपण सतत ऐकत असतो पण त्यापुढचा वरील विषय कुणी कधी कुठे बोलत नाही म्हणून मुद्दाम या विषयाला जाहीरपणे सदर करण्याचा "आर्ट सोसायटी ऑफ इंडिया" चा प्रयत्न आहे. 
 
रविवार, दिनांक ९ एप्रिल रोजी दु. ३ वा. सन्माननीय चित्रकार श्री विजय आचरेकर व श्री मनोज सकळे यांचे "नाविन्यपूर्ण संयुक्त चित्र प्रात्यक्षिक" (A Novel painting demonstration)  या नाविन्यपूर्ण प्रयोगात दोघेही चित्रकार आयत्या वेळेवर दिल्या गेलेल्या विषयावर तब्बल ५ फुट x ८ फुट आकाराच्या एकाच कॅनव्हास वर रसिकांसमोर आपापसात उघड चर्चा करून एकच चित्रकृती साकार करतील. भारतीय कलेच्या इतिहासात असा अभिनव प्रयोग प्रथमच  "आर्ट सोसायटी ऑफ इंडिया" च्या पुढाकाराने होत असावा. सदर कलाकृती त्याच ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असेल.
 
वरील सर्व कार्यक्रम सर्वांसाठी मोफत खुले आहेत. चित्र - शिल्प कलेचा प्रसार हा संस्थेच्या अनेक उद्दिष्टटांपैकी एक आहे. तेंव्हा रसिकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून कला चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घ्यावा व संस्थेला प्रोत्साहन द्यावे अशी विनंती संस्था या निमित्ताने करीत आहे.
 

Web Title: Century "Art Society of India".

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.