आयुर्वेदिक कॉलेजची षष्ट्यब्दी
By Admin | Published: February 16, 2015 03:50 AM2015-02-16T03:50:43+5:302015-02-16T03:50:43+5:30
आयुर्वेद ही वैद्यकीय शास्त्रातील सर्वात जुनी शाखा आहे. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या हेतूने स्थापन झालेल्या शीव येथील आयुर्विद्या
मुंबई : आयुर्वेद ही वैद्यकीय शास्त्रातील सर्वात जुनी शाखा आहे. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या हेतूने स्थापन झालेल्या शीव येथील आयुर्विद्या प्रसारक मंडळ संचालित आयुर्वेद महाविद्यालय आणि शेठ रणछोडदास वरजीवनदास आयुर्वेदीय रुग्णालयाने यंदा ६० वर्षे पूर्ण केली आहेत. गेल्या साठ वर्षांमध्ये हे रुग्णालय अनेक गोरगरिबांचा आधारवड बनली आहे. संस्थेचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा २२ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे.
१९४८ साली आयुर्विद्या प्रसारक मंडळाची नोंदणी करण्यात आली. यानंतर १९५४ साली आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना झाली. त्याआधी आयुर्वेद रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग हा गिरगाव येथील मुगभाटमध्ये कार्यरत होता. शीव येथे मंडळाला जागा मिळाल्यानंतर महाविद्यालय आणि रुग्णालयाची सुरूवात आता ज्या ठिकाणी रुग्णालय आहे तिथे करण्यात आली. सध्या या रुग्णालयामध्ये १४ विभाग कार्यरत आहेत. दररोज २०० रुग्ण‘ओपीडी’त येतात. त्यांना अल्प दरात उपचार दिले जातात. सध्या ९० ते १०० रुग्णांना दाखल करून घेतले जाते. अत्यल्प दरात त्यांना नाश्ता, जेवण, चहा, औषधे आणि आयुर्वेदिक उपचार दिले जातात. रुग्णालयात सामान्य शस्त्रक्रिया आणि डोळ््यावर शस्त्रक्रिया केल्या जातात. शारीरिक उपचार केल्याने रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकत नाही वॉर्डच्या बाजूलाच रातराणीची झाडे लावण्यात आली आहेत. रातराणीच्या गंधामुळे रुग्णांचे मन प्रसन्न होते. याला गंध चिकित्सा असे म्हटले जाते. (प्रतिनिधी)