सीईटी परीक्षाच्या तारखा जाहीर
By admin | Published: January 15, 2017 12:01 AM2017-01-15T00:01:07+5:302017-01-15T00:01:07+5:30
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे बीएड, एमएड, बीपीएड, एलएलबी या अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षांचे (सीईटी) संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे बीएड, एमएड, बीपीएड, एलएलबी या अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षांचे (सीईटी) संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करणे शक्य झाले आहे.
प्रथमच घेण्यात आलेल्या एलएलबीच्या सीईटी परीक्षेस उशीर झाला होता.
एलएलबीची प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यापर्यंत सुरू होती. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून तीव्रनाराजी व्यक्त करण्यात आली. परंतु व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या त्यामुळे विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)
सीईटीच्या प्रस्तावित तारखा
१)बीएड : ७ व ८ एप्रिल
२) एमएड : ९ एप्रिल
३) एलएलबी-३ वर्षीय : २२ एप्रिल
४) एलएलबी-५ वर्षीय : २३ एप्रिल
५) बीपीएड : २० मे
६) एमपीएड : २१ मे