आजपासून होणार सीईटी परीक्षा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 03:21 AM2020-10-01T03:21:14+5:302020-10-01T03:21:34+5:30
१ ते २० आॅक्टोबरदरम्यान चालणाºया सीईटी परीक्षेसाठी देशातून एकूण ४ लाख ५१ हजार ९०६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. परीक्षा दोन टप्प्यांत होणार आहे.
मुंबई : इंजिनीअरिंग, मेडिकल, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. राज्यातील तब्बल १८० केंद्रांवर तर महाराष्ट्राबाहेर १० केंद्रांवर ही परीक्षा होईल.
राज्यातून एकूण ४ लाख ३२ हजार १० विद्यार्थी परीक्षा देतील. ही परीक्षा देणाऱ्या परराज्यातील विद्यार्थ्यांची संख्या १९ हजार ८९६ आहे. यंदा तब्बल ९० हजार ५२४ विद्यार्थी पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही गटांच्या परीक्षा देणार आहेत.
१ ते २० आॅक्टोबरदरम्यान चालणाºया सीईटी परीक्षेसाठी देशातून एकूण ४ लाख ५१ हजार ९०६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. परीक्षा दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात पीसीबी (फिजिक्स-केमिस्ट्री-बायोलॉजी) ग्रुपची परीक्षा असून ही परीक्षा १, २, ४, ५, ६, ७, ८, ९ या तारखांना तर दुसºया टप्प्यातील पीसीएम (फिजिक्स-केमिस्ट्र-मॅथ्स) ग्रुपच्या परीक्षा १२, १३, १४, १५, १६, १९, २० या तारखांना होणार आहेत.
परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या १ लाख ९२ हजार ७४३ तर मुलांची संख्या २ लाख ५९ हजार १३४ इतकी आहे. २९ तृतीयपंथी विद्यार्थी ही परीक्षा देतील.
महाराष्ट्राप्रमाणेच आंध्र प्रदेश, राजस्थान, पंजाब, सिक्कीम, पश्चिम बंगाल अशा विविध ३२ राज्यांतून विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, राज्याबाहेर १० मध्यवर्ती केंद्रांची सोय आहे. पीसीएम व पीसीबी या दोन्ही ग्रुपसाठी राज्यातून ८९ हजार ८४५ तर परराज्यातून ६७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातून झालेल्या नोंदणीमध्ये पुण्यातून सर्वाधिक ४०,६६१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्याखालोखाल मुंबई २५,४१७, अहमदनगर २५,२८७, नाशिक २२,६०७, नागपूर २२,५५६, ठाणे २३,१२० या जिल्ह्यांतून नोंदणी झाली.