हॉटेल मॅनेजमेंटची सीईटी परीक्षा मेमध्ये

By Admin | Published: April 2, 2017 01:23 AM2017-04-02T01:23:55+5:302017-04-02T01:23:55+5:30

राज्य सामायिक प्रवेश चाचणी कक्षामार्फत हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी १४ मे रोजी सीईटी घेतली जाणार आहे

CET Examination for Hotel Management | हॉटेल मॅनेजमेंटची सीईटी परीक्षा मेमध्ये

हॉटेल मॅनेजमेंटची सीईटी परीक्षा मेमध्ये

googlenewsNext

पुणे : राज्य सामायिक प्रवेश चाचणी कक्षामार्फत हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी १४ मे रोजी सीईटी घेतली जाणार आहे. त्यासाठी ३ ते २८ एप्रिलदरम्यान इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील.
कक्षामार्फत शनिवारी सीईटीसाठी नोंदणी करण्याबाबतचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. हॉटेल मॅनेजमेंटच्या चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी ही आॅनलाइन सीईटी घेतली जाणार आहे. नोंदणी करण्याची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाइन होणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. इयत्ता बारावी उत्तीर्ण किंवा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांसाठी ८०० रुपये तर आरक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये शुल्क असेल, असे कक्षातर्फे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: CET Examination for Hotel Management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.