सीईटी परीक्षेत सोलापूरचा विजय मु्द्रा राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2017 01:20 PM2017-06-04T13:20:29+5:302017-06-04T13:20:29+5:30
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत इंजिनिअरिंग आणि मेडीकल अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक
Next
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 4 - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत इंजिनिअरिंग आणि मेडीकल अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेत सोलापूरचा विजय जगदीश मुंद्रा हा विद्यार्थी राज्यात प्रथम आलाय. विजयने पीसीएम गटातून २०० पैकी १९७ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविलाय. हा निकाल शनिवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. या परीक्षेत स्मित धरमशी रामभिया हा देखील प्रथम आलाय.

विशेष म्हणजे विजय मुंद्रा या विद्यार्थी बारावीच्या परिक्षेतही सोलापूर जिल्ह्यात पहिला आलाय. बारावीत ९६.३ % मार्क मिळालेत. घरची परिस्थिती बेताची असून विजय हा सीईटी साठी रोज पाच ते सहा तास अभ्यास करत होता. गेल्या वर्षभरापासून तो तयारी करत होता. सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयाचा तो विद्यार्थी असून पुढे तो इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणार आहे. पदवीनंतर तो लोकसेवा परीक्षेत आपले नशीब आजमावणार आहे. सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातून विजयवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. संगमेश्वर महाविद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनीही विजयचा सत्कार केला.