सीईटीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ५ गुण

By admin | Published: June 5, 2017 01:29 AM2017-06-05T01:29:25+5:302017-06-05T01:29:25+5:30

सामाईक प्रवेश परीक्षेमधील (एमएचटी-सीईटी) ४ प्रश्न व त्यांची उत्तरे चुकली असल्याने त्याचे ५ गुण विद्यार्थ्यांना दिले जाणार असल्याचे तंत्र शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले

CET students will get 5 marks | सीईटीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ५ गुण

सीईटीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ५ गुण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेमधील (एमएचटी-सीईटी) ४ प्रश्न व त्यांची उत्तरे चुकली असल्याने त्याचे ५ गुण विद्यार्थ्यांना दिले जाणार असल्याचे तंत्र शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भौतिकशास्त्र (१ प्रश्न १ गुण), रसायनशास्त्र (२ प्रश्न २ गुण) व गणित (१ प्रश्न २ गुण) असे ३ विषयांमधील ४ प्रश्नांचे ५ गुण विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयानुसार दिले जाणार आहेत.
प्रथम वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी प्रवेश कक्षामार्फत दि. ११ मे रोजी सीईटी घेण्यात आली होती. त्याचा निकाल ३ जून (शनिवार) जाहीर करण्यात आला. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) अशा दोन गटांत ही परीक्षा घेण्यात आली होती. प्रवेशपरीक्षेसाठी एकूण ३ लाख ८९ हजार ५२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ८५ हजार ९६३ मुले व ९८ हजार २७६ मुलींनी ‘पीसीएम’ गटात तर १ लाख २२ हजार ३११ मुले व १ लाख १६ हजार ५४ मुलींनी ‘पीसीबी’ गटात परीक्षा दिली. पीसीएम हा गट असलेल्या विद्यार्थ्यांना ५ गुण तर पीसीबी हा गट असलेल्या विद्यार्थ्यांना ३ गुण मिळणार आहेत.
सीईटी परीक्षेनंतर काही प्रश्न चुकल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. त्यानुसार तज्ज्ञ शिक्षकांमार्फत प्रश्न व त्यांच्या उत्तरांची पडताळणी केल्यानंतर ४ प्रश्न चुकले असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या विषयाच्या गटानुसार त्यांना गुण दिले जाणार आहेत. इंजिनिअरींगच्या प्रवेशासाठी एक-एक गुणांवरून मोठी स्पर्धा करावी लागत असते, त्यामुळे चुकीच्या प्रश्नांबाबत योग्य निर्णय घेतला गेल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: CET students will get 5 marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.