राज्यात आज सीईटी

By Admin | Published: May 5, 2016 04:09 AM2016-05-05T04:09:37+5:302016-05-05T04:09:37+5:30

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सरकारकडून घेण्यात येणारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) गुरुवारी होणार आहे.

CET today in the state | राज्यात आज सीईटी

राज्यात आज सीईटी

googlenewsNext

मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सरकारकडून घेण्यात येणारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) गुरुवारी होणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील १ हजार ५४ कनिष्ठ महाविद्यालयांतील केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येईल. त्यासाठी एकूण ४ लाख ९ हजार २६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयात ‘नीट’विरोधात राज्य सरकारची लढाई सुरू असल्याने एमएचटी-सीईटीबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही धाकधूक कायम आहे. नीटविरोधात
राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात
दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारीच सुनावणी होत असल्याने विद्यार्थ्यांवरील ताण कायम आहे.
सध्या तरी प्रथम वर्ष अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश हे सीईटीच्या निकालावर अवलंबून असतील. नीट ही परीक्षा एमबीबीएस आणि बीडीएस याच अभ्यासक्रमांसाठी असल्याने फेरयाचिकेचा निकाल राज्य सरकारविरोधात लागला, तरी इतर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

अशी असेल परीक्षा़़़
- सकाळी ९.१५ वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येईल.
- सकाळी १० वाजता सुरू होणारी परीक्षा सायंकाळी ४.३० पर्यंत सुरू असेल.
- पहिला पेपर भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र, त्यानंतर जीवशास्त्र
आणि त्यानंतर गणिताचा पेपर असेल.
- दोन पेपरनंतर विद्यार्थ्यांना ४५ मिनिटांचा ब्रेक दिला जाईल.

Web Title: CET today in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.