राज्यभरातून ३ लाख ९६ हजार विद्यार्थी देणार सीईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 05:58 AM2019-04-10T05:58:23+5:302019-04-10T05:58:33+5:30

पुण्यातून सर्वाधिक ३६,३१६ अर्ज, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वात कमी २,४७४ जणांनी केली नोंदणी

The CET will not give 3,696 students across the state | राज्यभरातून ३ लाख ९६ हजार विद्यार्थी देणार सीईटी

राज्यभरातून ३ लाख ९६ हजार विद्यार्थी देणार सीईटी

Next

मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशांकरिता घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा २ मे ते १३ मे दरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातून ३,९६,६२४ प्रवेश निश्चित झाले आहेत, तर देशभरातून ४,१३,२८४ अर्ज दाखल झाले आहेत.


राज्यभरातून सर्वात जास्त ३६,३१६ एवढे अर्ज पुण्यातून आले आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वात कमी २,४७४ अर्जांची नोंद झाल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे. मुंबईतून ७,६८७ तर मुंबई उपनगरातून १६,९०० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.


राज्यभरातील एकूण अर्जांपैकी पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) साठी १,०७,२०४, तर पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) साठी १,१९,९९२ आणि पीसीएमबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र) साठी १,६९,४२८ अर्ज दाखल झाले.
देशभरातून प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये खुल्या वर्गातून ९४,३८५ विद्यार्थी, ६०,६७७ विद्यार्थिनी आणि सात तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तर आरक्षित गटात २,४१,८२६ विद्यार्थी, १,७१,४४५ विद्यार्थिनी तसेच १३ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.


विद्यार्थ्यांसाठी माध्यम निवडीचा पर्याय
एमएचटी-सीईटीसाठी आलेल्या एकूण अर्जांपैकी ४,०६,२८६ अर्ज इंग्रजी माध्यम, ५८३१ अर्ज मराठी माध्यम, तर १,१६७ अर्ज उर्दू मध्यमातून परीक्षा देण्यासाठी दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, माध्यम निवडीसाठी विद्यार्थ्यांना पर्याय खुला ठेवणार असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आलीे.

Web Title: The CET will not give 3,696 students across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.