मौजमजेसाठी दुचाकी चोरणा-यांना ठोकल्या बेड्या
By admin | Published: June 17, 2016 06:43 PM2016-06-17T18:43:52+5:302016-06-17T18:43:52+5:30
तीन मोटारसायकल चोरणा-यांना अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी दिली.
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 17 - मोटार सायकल चोरी करून त्यांच्या विक्रीतून मौज-मज्जा करणार्या तीन मोटारसायकल चोरणा-यांना अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी दिली. अटक करण्यात आलेल्यामध्ये हणमंत तानाजी देवकर (वय 21, रा. परिचारक नगर, पंढरपूर), आण्णा उर्फ अनिल भिमराव घोडके (वय 21, रा. फुटरस्ता, कोटी, ता. पंढरपूर), अक्षय राम काळे (वय 21, रा. कुंभार गल्ली, पंढरपूर) यांची नावे आहेत.
पंढरपूर मंगळवेढा, अकलूज, सांगोला आदी भागात हणमंत तानाजी देवकर (वय 21, रा. परिचारक नगर, पंढरपूर), आण्णा उर्फ अनिल भिमराव घोडके (वय 21, रा. फुटरस्ता, कोटी, ता. पंढरपूर), अक्षय राम काळे (वय 21, रा. कुंभार गल्ली, पंढरपूर) हे मोटार सायकल चोरी करतात. त्यांची कमी किमतीत विक्री करतात आणि मिळालेल्या पैशातून मौजमज्जा करतात.
हे तिघे त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांना मिळाली. पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरक्षक किशोर नावंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. आर. शेख यांनी तात्काळ त्या तीन मोटारसायकल चोरांना अटक केली. अटक करण्यात आलेल्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, पंढरपूर मंगळवेढा, अकलूज आणि सांगोला येथून मोटारसायकली चोरी केल्या. आजपर्यंत त्यांनी चोरी केलेल्या 10 मोटारसायकली देऊन चोरी केल्याची कबुली दिली.
चोरी केलेल्या मोटारसायकलीमध्ये 8 हिरो होंडा स्पेंल्डर मोटारसायकली, 1 टीव्ही, स्टार, मोटारसायकल आणि 1 हिरो शाईन या गाड्या जप्त करण्यात आल्या. हे आरोपी मोटारसायकली चोर्या करून त्यांची विक्री करतात. त्यातून आलेला पैश्यातून मौजमजा करतात, असे तपासात समोर आल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी दिली आहे.