एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला
By admin | Published: June 28, 2017 01:35 AM2017-06-28T01:35:55+5:302017-06-28T01:35:55+5:30
एकतर्फी प्रेमातून भांडूप येथील एका २५ वर्षीय तरुणीवर चाकूहल्ला करून युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. आकाश पांडे (२७) असे या हल्लेखोर तरूणाचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकतर्फी प्रेमातून भांडूप येथील एका २५ वर्षीय तरुणीवर चाकूहल्ला करून युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. आकाश पांडे (२७) असे या हल्लेखोर तरूणाचे नाव आहे.
भांडूप येथे राहणारा पांडे रेल्वे कंत्राटी कामगार असून दोन वर्षापासून तो सदर तरुणीला प्रेमासाठी गळ घालत होता. परंतु तरुणीने त्याला नकार दिला होता. याचाच राग मनात ठेवून पांडे याने मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सदर तरुणीच्या घरात
घुसून तिच्यावर चाकूहल्ला केला. यावेळी घरात आई आणि
मुलगी दोघेच होते. मुलीवर चाकूने वार केल्यानंतर हल्लेखोर पांडेने स्वत:वर वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.
सदर घटनेनंतर मुलीच्या आईने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धावत घेत पीडित तरुणी आणि हल्लेखोर पांडेला रुग्णालयात दाखल केले.
सध्या दोघांची प्रकृती चिंताजनक असून हल्लेखोर तरुणावर सायन रुग्णालयात तर युवतीवर भांडूप येथी खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
भांडूप पोलिसांनी रात्री उशिरा या प्रकरणी हल्लेखोर पांडेवर गुन्हा दाखल केला.