Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!

By Ajay.patil | Published: November 17, 2024 01:11 PM2024-11-17T13:11:10+5:302024-11-17T13:12:10+5:30

जळगाव : लोकसभेच्या निवडणुकीत खासदारकीचे तिकीट कापल्यानंतर भाजप सोडून उद्धवसेनेत प्रवेश केलेले माजी खासदार उन्मेष पाटील हे चाळीसगाव मतदारसंघात ...

Chalisgaon Vidhan Sabha: A bitter fight between old friends! | Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!

Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!

जळगाव : लोकसभेच्या निवडणुकीत खासदारकीचे तिकीट कापल्यानंतर भाजप सोडून उद्धवसेनेत प्रवेश केलेले माजी खासदार उन्मेष पाटील हे चाळीसगाव मतदारसंघात आपले नशीब आजमावत आहेत. १० वर्षांपासून हाती असलेल्या या गडात भाजपने उन्मेष पाटील यांच्या विरोधात विद्यमान आमदार तथा एकेकाळचे त्यांचे मित्र असलेल्या मंगेश चव्हाण यांना मैदानात कायम ठेवल्याने दोन मित्रांमधील लढत चर्चित ठरली आहे. 

कधीकाळी घट्ट मैत्री असलेल्या या मित्रांमध्ये कुटुता निर्माण झाली.  महायुती किंवा महाविकास आघाडीत बंडखोरी नसल्याने जुन्या मित्रांमध्ये थेट सामना रंगणार आहे.  

१९९० पासून २००९ वगळता २०१९ पर्यंत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात मोठी रंगत येणार आहे.  या मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उद्धवसेनेचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या आहेत. सध्या या मतदारसंघात सभांमधून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

मतदारसंघातील कळीचे मुद्दे 

-मतदारसंघातील जनतेची कामे करण्यासाठी मंगेश चव्हाण यांनी उभी केलीली यंत्रणा, विकास कामे व चौक सुशोभीकरणासह प्रत्येक वर्षाला पंढरपूरची मोफत वारी या कामांच्या जोरावर मंगेश चव्हाण मतदारांना साद घालीत आहेत .    

-खासदार असताना केलेली कामे नार-पार योजनेवरुन विरोधकांना उन्मेष पाटील यांनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. 

-जुने मित्र असल्याने दोघांकडून ऐकमेकांवर व्यक्तिगत आरोप करीत प्रचाराची रणधुमाळी उडवून दिली आहे. 

-मंगेश चव्हाण यांच्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तर उन्मेश पाटलांसाठी उद्धव ठाकरे यांची सभा झाल्याने वातावरण तापले असून कुठला मित्र मतदार आपल्याकडे वळविण्यात यशस्वी होतो, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Chalisgaon Vidhan Sabha: A bitter fight between old friends!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.