‘नमो’ लाट थोपविणो मनसेसमोरील आव्हान?

By admin | Published: July 8, 2014 12:32 AM2014-07-08T00:32:14+5:302014-07-08T00:32:14+5:30

मराठी मतदार बहुसंख्य असलेल्या घाटकोपर पश्चिम मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध महायुती असा थेट संघर्ष पाहायला मिळू शकेल.

Challenge against 'Namo wave' Thapavino MNS? | ‘नमो’ लाट थोपविणो मनसेसमोरील आव्हान?

‘नमो’ लाट थोपविणो मनसेसमोरील आव्हान?

Next
जयेश शिरसाट - मुंबई
मराठी मतदार बहुसंख्य असलेल्या घाटकोपर पश्चिम मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध महायुती असा थेट संघर्ष पाहायला मिळू शकेल.
या मतदारसंघात सध्या मनसेचे राम कदम आमदार आहेत. 2क्क्9मध्ये झालेल्या लढतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लाटेमुळे कदम 26 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे पूनम महाजन आणि काँग्रेसतर्फे जेनेट डिसूजा यांचे आव्हान होते. महाजन यांच्या उमेदवारीमुळे पक्षांतर्गत नाराजीही कदम यांच्या पथ्यावर पडली होती. 
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने उमेदवार दिला नव्हता. महायुती, आघाडीत थेट लढत होती. मोदी लाटेने या मराठी मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला तब्बल 94 हजार मते पडली. इतकेच नव्हे तर या उमेदवाराने 65 हजारांचे मताधिक्क्य घेतले. हे मताधिक्य गेल्या विधानसभा लढतीत मनसेच्या कदम यांना पडलेल्या मतांपेक्षा पाच हजारांनी जास्त आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या लढतीत मोदी लाट थोपविणो मनसेसाठी मोठे आव्हान असेल. 
या पाश्र्वभूमीवर या मतदारसंघातून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास मनसे आमदार कदम उत्सुक आहेत. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षकार्यकत्र्याना आलेली मरगळ पाहता येथील पक्षबांधणी करण्याची जबाबदारी पक्षाने महापालिकेतील माजी गटनेते दिलीप लांडे यांच्यावर सोपवली. गेल्या दिडेक वर्षापासून लांडे या मतदारसंघात पक्षबांधणीचे काम करत आहेत. त्यामुळे येथील लढतीसाठी लांडे यांचेही नाव मनसे कार्यकत्र्याच्या तोंडी ऐकू येते. काँग्रेसतर्फे डिसुजा पुन्हा रिंगणात उतरण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र या वेळीही त्यांना पक्षांतर्गत स्पध्रेला तोंड द्यावे लागेल. घाटकोपर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढलेले पक्षाचे नेते वीरेंद्र बक्षीही इच्छुक असल्याची चर्चा आहे. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन निवडून आल्याने घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून भाजपाचे महासचिव विनायक कामत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. 
हा मतदारसंघ डोंगरांवरील वस्त्या, झोपडपट्टय़ांचा असून इथे कामगार वर्ग राहतो. तब्बल 6क् टक्के मतदार मराठी आहे. उर्वरित मतदार मुस्लीम, उत्तर भारतीय आणि गुजराती  आहेत. येथील बहुसंख्य वस्त्यांमध्ये पाणीपुरवठय़ाचा प्रश्न गंभीर आहे. रखडलेले एसआरए प्रकल्प, स्वच्छता, आरोग्य, रस्ते, वैद्यकीय सुविधा या पायाभूत सुविधांचेही प्रश्न तसेच आहेत. त्यामुळे येथे सत्तापरिवर्तनही होण्याची शक्यता आहे.  
 
राम कदम, मनसे - 6क्343
पूनम महाजन, भाजपा - 34115
जेनेट डिसूजा - 3क्36क्
 
महायुती - 94,465
आघाडी - 29,422
आप - 1क्,क्88
बसपा - 2,927

 

Web Title: Challenge against 'Namo wave' Thapavino MNS?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.