शस्त्रास्त्र तस्करीच्या म्होरक्यांचे आव्हानच

By Admin | Published: July 14, 2017 03:47 AM2017-07-14T03:47:43+5:302017-07-14T03:47:43+5:30

शहरात बेकायदा गावठी कट्टे, पिस्तूल उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांतून येतात

Challenge of Arms trafficking | शस्त्रास्त्र तस्करीच्या म्होरक्यांचे आव्हानच

शस्त्रास्त्र तस्करीच्या म्होरक्यांचे आव्हानच

googlenewsNext

आकाश गायकवाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहरात बेकायदा गावठी कट्टे, पिस्तूल उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांतून येतात. मात्र, या धंद्यातील म्होरके कधीही थेट समोर येत नाहीत. दलालांमार्फत ही शस्त्रे वेगवेगळ्या राज्यांमध्ये धाडली जातात. तसेच या राज्यांमध्ये शस्त्रास्त्रांच्या तस्करीच्या तपासाकरिता गेल्यावर स्थानिक पोेलीस सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे बेकायदा शस्त्रांच्या तस्करीतील मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यात अडचणी येतात, अशी हतबलता पोलिसांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
कल्याण परिमंडळ-३ च्या हद्दीत बेकायदा शस्त्रांची विक्री करण्याकरिता गेल्या सहा महिन्यांत तीन गुन्ह्यांत चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून ५ गावठी कट्टे, एक लोखंडी पिस्तूल, एक मॅग्झीन आणि ७ जिवंत पुंगळ्या हस्तगत करण्यात आल्या. हे सर्व आरोपी सध्या कल्याणच्या आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत आहेत. जप्त शस्त्रसाठ्याची केमिकल अ‍ॅनलायझरकडून तपासणी करण्यासाठी पाठवली आहेत. आतापर्यंत पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभाग यांनी पकडलेले सर्व आरोपी खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरू न जेरबंद झाले आहेत.
दररोज हजारो प्रवासी कल्याण-डोंबिवली शहरांत रेल्वेतून येतात आणि जातात. त्यातील कोण शस्त्र घेऊन आला आहे, कुणीच सांगू शकत नाही. ती व्यक्ती जेव्हा परराज्यांतून आणलेले शस्त्र विकण्याचा प्रयत्न करते, तेव्हा खबऱ्यांना त्याची कुणकुण लागते आणि तेच ही माहिती पोलिसांना देतात, अशी कबुली पोलीस अधिकारी खासगीत देतात. एखादाच आरोपी पोलिसांची नजर चुकवून पळण्याच्या बेतात असेल व पोलिसांच्या नजरेस आला, तर तो पकडला जातो.
रेल्वेस्थानकात हजारो प्रवासी येजा करत असल्याने प्रत्येकाची बॅग तपासली जात नाही. जे यापूर्वी या परिसरात राहिले आहेत किंवा ज्यांचे नातलग या शहरात वास्तव्याला आहेत, त्यांना ५ ते १० हजार रुपयांचे आमिष दाखवून शस्त्रे विकण्याकरिता धाडले जाते.
उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यात गावठी कट्टे, पिस्तूल तयार करण्याचे अड्डे असून तेथून ते महाराष्ट्रात पाठवले जातात. त्या राज्यांत गरिबी आणि बेरोजगारी असल्याने किरकोळ रकमेची लालूच दाखवून शस्त्रांचे पाकीट महाराष्ट्रातील विशिष्ट व्यक्तीला नेऊन देण्यास सांगितले जाते. शस्त्रांच्या तस्करीच्या धंद्यातील म्होरक्याची शस्त्र घेऊन येणाऱ्याला तसेच ज्याला तो येथे विकण्याकरिता देतो, त्या दलालाला नीट माहिती नसते.
त्यामुळे पकडलेली व्यक्ती शस्त्रांच्या धंद्याच्या म्होरक्यापर्यंत पोलिसांना घेऊन जाऊ शकत नाही. दलालापर्यंत यशस्वीपणे शस्त्रे पोहोचवलेली व्यक्ती बऱ्याचदा आपल्या नातेवाइकांकडे वास्तव्य करते. येथे बिगारी काम करते आणि काही काळ मुंबईत घालवल्यावर माघारी जाते. पक डलेले शस्त्र उत्तर प्रदेश, बिहार येथे एखाद्या गुन्ह्यात वापरू न येथे विक्रीसाठी पाठवलेले असू शकते, असे काही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
>बालकांचा सर्वाधिक वापर
बेकायदा शस्त्राची तस्करी केल्याबद्दल आरोपींना ३ ते ७ वर्षांची शिक्षा होते.
मात्र, त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला त्यांच्या कुटुंबीयांना दिला जातो.
शस्त्राची तस्करी करणारा बालगुन्हेगार असल्यास त्याला बालसुधारगृहातून काही महिन्यांतच सोडून दिले जाते.
त्यामुळे परराज्यांतून शस्त्रे आणण्याकरिता बऱ्याचदा अल्पवयीन मुलांचा वापर करण्यावर भर दिला जातो.
>पोलीस ठाणे मानपाडा
अपराध घडला
दिनांक-२
फेब्रुवारी २०१७
आरोपीचे नाव- रोहित परब आणि विलास ऊर्फ दीपक गुप्ता
जप्त शस्त्र- एक लोखंडी पिस्तूल, एक लोखंडी मॅग्झीनसह दोन जिवंत राउंड
>पोलीस ठाणे-मानपाडा
अपराध घडला दिनांक-२९ जून २०१७
आरोपीचे नाव-शफीक अन्सारी
जप्त शस्त्र -चार लोखंडी कट्टे, चार पितळी जिवंत काडतुसे
>पोलीस ठाणे-खडकपाडा
अपराध घडला दिनांक-६ जून २०१७
आरोपीचे नाव-
गणेश सोनी
जप्त शस्त्र -एक गावठी कट्टा, एक पितळी जिवंत काडतूस
>शस्त्रांचा प्रकार आणि भाव
शस्त्रांचे प्रकार खरेदी भाव विक्री भाव (हजार रुपयांत)
गावठी कट्टा ३ ते ५ १५ ते २०
पिस्तूल व मॅग्झीन २५ ते ३० १ ते १.५ लाख
लोखंडी पिस्तूल १५ ते २० ८० हजार ते १लाख

Web Title: Challenge of Arms trafficking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.