मतांची फूट टाळण्याचे विदर्भवाद्यांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2017 08:57 PM2017-01-18T20:57:12+5:302017-01-18T20:57:12+5:30

आगामी महानगरपालिका निवडणूकांसाठी विदर्भवाद्यांनीदेखील दंड थोपटले आहेत. नगरपरिषद निवडणूकांत यश मिळविणारा ‘विदर्भ माझा’ व राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे

Challenge before the Vidarbhis to avoid the split of votes | मतांची फूट टाळण्याचे विदर्भवाद्यांसमोर आव्हान

मतांची फूट टाळण्याचे विदर्भवाद्यांसमोर आव्हान

Next
id="yui_3_16_0_ym19_1_1484745465506_40092">योगेश पांडे / ऑनलाइन लोकमत
नागपूर,दि. 18 - आगामी महानगरपालिका निवडणूकांसाठी विदर्भवाद्यांनीदेखील दंड थोपटले आहेत. नगरपरिषद निवडणूकांत यश मिळविणारा ‘विदर्भ माझा’ व राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या ‘विदर्भ राज्य आघाडी’ हे केवळ विदर्भ हाच मुद्दा घेऊन निवडणूकांत उतरणार आहेत. शहरातील काही जागांवर हे दोन्ही पक्ष आमनेसामने येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत विदर्भवाद्यांची मते दुभंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पेचातून मार्ग कसा काढायचा याबाबत पक्षांमध्ये विचार सुरू आहे.
 
एरवी दर निवडणूकांत विविध पक्षांकडून प्रचारात विदर्भाचा मुद्दा असतो. मात्र गेल्या काही काळापासून वेगळ््या विदर्भ राज्याच्या मागणीने परत जोर धरला आहे. यंदा केवळ विदर्भ हाच मुद्दा घेऊन राजकुमार तिरपुडे यांचा ‘विदर्भ माझा’ व अणे यांची ‘विरा’ निवडणूकांत उतरणार आहे. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याला परत ऐरणीवर आणणारे अ‍ॅड.श्रीहरी अणे हे स्वत: प्रचारात उतरणार आहेत. या पार्श्वभूमीवर ‘विरा’च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. दुसरीकडे काटोल नगर परिषदेवर विजयाचा झेंडा फडकविणारा ‘विदर्भ माझा’ पक्षदेखील चांगलात चर्चेत आहे. ‘विदर्भ माझा’कडूनदेखील नागपूर मनपा निवडणूकांची जोरदार तयारी सुरू आहे. अशा स्थितीत या दोन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने आल्यास विदर्भवादी मतदारांची मते दुभंगण्याची शक्यता आहे. असे झाले तर दोन्ही पक्षांचे नुकसानच होणार आहे. हीच बाब लक्षात घेता दोन्ही पक्षांमध्ये समन्वय सुरू आहे. मात्र अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झाला नसल्याने निवडणूकांत काय होणार हा प्रश्न कायम आहे.
 
विदर्भवादी पक्षांचा मोट बांधणार कशी ?
मनपा निवडणूकांत सर्व जागांवर निवडणूक लढणार असल्याची घोषणा ‘विदर्भ माझा’तर्फे अगोदरच करण्यात आली आहे. त्यांनी ८ उमेदवार घोषितही केले आहेत. दुसरीकडे सद्यस्थितीत ‘विरा’ने केवळ एकाच प्रभागात उमेदवार उतरविण्याची घोषणा केली आहे. लहानमोठ्या १८ विदर्भवादी पक्षांची मोट बांधण्याचे अणे यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे नेमक्या किती ठिकाणी ‘विरा’ निवडणूक लढणार हे निश्चित झालेले नाही. मात्र ही मोट बांधणार कशी हा प्रश्नदेखील अनुत्तरीतच आहे. 
 
तिरपुडे म्हणतात, जो जिता वही सिकंदर
यासंदर्भात ‘विदर्भ माझा’चे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांच्याशी संपर्क केला असता, आम्ही सर्व जागांवर निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विदर्भाच्या नावावर अनेक पक्ष निवडणूक लढत आहेत. मात्र राजकीय आखाड्यात जो जिंकतो तोच सिकंदर ठरतो. विदर्भवाद्यांची मते दुभंगतील असे वाटत नाही, असे ते म्हणाले. दुसरीकडे ‘विरा’चे अध्यक्ष रवी संन्याल यांनी मात्र ‘विदर्भ माझा’सोबत समन्वय साधणार असल्याचे सांगितले. नेमक्या किती ठिकाणी ‘विरा’ निवडणूक लढेल हे सांगता येत नाही. मात्र विदर्भवाद्यांची मते फुटू नयेत यासाठी आम्ही अणे यांच्या नेतृत्वात पुढाकार घेऊ. एकमेकांना फटका बसू नये अशी रुपरेषा तयार करु, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Challenge before the Vidarbhis to avoid the split of votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.