आव्हान व्होटर स्लीप वाटण्याचे
By admin | Published: October 1, 2014 12:10 AM2014-10-01T00:10:56+5:302014-10-01T00:10:56+5:30
मतदान केंद्रस्तरीय अधिका:यामार्फत जिल्ह्यातील सुमारे 69 लाख मतदारांना छायाचित्र असलेल्या मतदार स्लीपचे (फोटो व्होटर स्लीप) वाटप करण्यास सुरुवात झाली आहे.
Next
>पुणो : मतदान केंद्रस्तरीय अधिका:यामार्फत जिल्ह्यातील सुमारे 69 लाख मतदारांना छायाचित्र असलेल्या मतदार स्लीपचे (फोटो व्होटर स्लीप) वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. मतदानाच्या दिवसाआधी 5 दिवस हे ओळखपत्र देण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरविले आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत दररोज सव्वाशेच्या सरासरीने अधिका:यांना स्लीप वाटप करण्याचे आव्हान पेलावे लागेल.
जिल्ह्यात साधारणपणो 1 हजार 2क्क् मतदारांमागे एका मतदान केंद्राची रचना करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 7 हजार 475 मतदान केंद्रे असून, केंद्रस्तरीय अधिका:यांची (बीएलओ) संख्याही तितकीच आहे. या अधिका:यांमार्फत मतदारांच्या घरी जाऊन फोटो व्होटर स्लीप देण्यात येणार आहेत. साधारणपणो एका अधिका:याला 1,2क्क् मतदारांना व्होटर स्लीप द्याव्या लागतील. येत्या 1क् दिवसांत मतदारांना व्होटर स्लीप द्यायची असल्याने एका दिवसात सरासरी 12क् मतदारांर्पयत पोहोचणो आवश्यक आहे.
मतदानाची प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी व बोगस मतदानाला आळा बसावा, या हेतूंनी प्रत्येक मतदाराला ओळखपत्र देण्याचे निवडणूक आयोगाने ठरविले आहे. यापूर्वी उमेदवारच मतदारांना स्लीप देत होते. मतदान कक्षात जाताना त्या स्लीपवर असलेले उमेदवाराचे नाव व निवडणूक चिन्ह यांमुळे नकळतच आचारसंहितेचा भंग होत होता. त्यामुळे उमेदवारांकडून देण्यात येत असलेल्या स्लीपवर बंदी घालण्यात आली. या पाश्र्वभूमीवर, निवडणूक आयोगाने मतदारांना ओळखपत्र देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
ग्रामीण भागात तलाठी, मंडल अधिकारी, कोतवाल, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीमधील कर्मचारी आदींची मदत होणार असल्याने ग्रामीण भागात लवकर ओळखपत्रंचे वाटप होईल. त्यामानाने शहरी भागात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. तसेच, पत्ते शोधावे लागत असल्याने शहरी भागात तुलनेने वाटपाचे काम अधिक जिकिरीचे आहे. व्होटर स्लीपवर मतदाराचे नाव, छायाचित्र, मतदान केंद्र, मतदानाची वेळ, मतदार यादीतील अनुक्रमांक, अशी माहिती नमूद करण्यात आली आहे. मतदाराकडे अशी स्लीप असल्यास अन्य पुराव्याची आवश्यकता नसल्याचेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे तपासणी
4निवडणूक आयोगाकडून जिल्हा प्रशासनाला फोटो व्होटर स्लीपची यादी देण्यात आली असून, जिल्हा प्रशासन त्याची तपासणी करुन यादीतील अचूकता तपासून पाहत आहे. विधानसभा मतदारसंघानुसार या स्लीप संबधित निवडणूक निर्णय अधिका:यांना दिल्या जात असून, निवडणूक निर्णय अधिकारी त्या केंद्रस्तरीय अधिका:यांना देत आहेत.
4मतदानाची प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, बोगस मतदानाला आळा बसावा, या हेतूने प्रत्येक मतदाराला ओळखपत्र देण्याचे निवडणूक आयोगाने ठरविले आहे.