माता सरस्वतीच्या आराधनेला उच्च न्यायालयात आव्हान

By admin | Published: September 12, 2016 09:43 PM2016-09-12T21:43:35+5:302016-09-12T21:43:35+5:30

विद्येची देवता मानल्या जाणा-या माता सरस्वतीच्या आराधनेची सक्ती करण्यात येत असल्यामुळे एका विद्यार्थिनीच्या वडिलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

Challenge the worship of Mother Saraswati in the High Court | माता सरस्वतीच्या आराधनेला उच्च न्यायालयात आव्हान

माता सरस्वतीच्या आराधनेला उच्च न्यायालयात आव्हान

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १२ -  इन्स्टिट्युट ऑफ सायन्सच्या कन्या वसतीगृहात विद्येची देवता मानल्या जाणा-या माता सरस्वतीच्या आराधनेची सक्ती करण्यात येत असल्यामुळे एका विद्यार्थिनीच्या वडिलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. 
क्षमता वासनिक असे विद्यार्थिनीचे नाव असून ती मौदा येथील रहिवासी आहे. इन्स्टिट्युट ऑफ सायन्समधील बी.एससी. प्रथम वर्षात तिचा प्रवेश आहे. ती गेल्या जुलैमध्ये इन्स्टिट्युटच्या वसतीगृहात रहायला गेली. याचिकेतील माहितीनुसार, वसतीगृहाच्या कार्यालयात माता सरस्वतीची मूर्ती ठेवण्यात आली आहे. 
येथे माता सरस्वतीची रोज आराधना केली जाते. आराधनेसाठी वसतीगृहातील सर्व विद्यार्थिनींनी हजर राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. क्षमता एक दिवस आराधनेस उपस्थित राहिली. यानंतर तिने माता सरस्वतीची आराधना करण्यास नकार दिला. यानंतर तिला विविध प्रकारे त्रास देणे व धमकावने सुरू झाले. 
तिला एकटे पाडण्यात आले. यामुळे तिने ३ ऑगस्ट रोजी संस्था संचालकांकडे तक्रार केली पण, त्याची दखल घेण्यात आली नाही. ६ आॅगस्ट रोजी तिने संचालकांना स्मरणपत्र दिले. परंतु, कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. परिणामी तिने २८ ऑगस्ट रोजी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तिची तक्रार स्वीकारली, पण एफआयआर नोंदविला नाही. यामुळे क्षमताचे वडील सिद्धार्थ वासनिक यांच्यासह उमेश गजभिये यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 
शासकीय अनुदानित संस्था असल्यामुळे राज्यघटनेनुसार या ठिकाणी एका धर्माशी संबंधित उपक्रम राबविले जाऊ शकत नाही. यासंदर्भात आवश्यक निर्देश देण्यात यावेत, वसतीगृहातील कार्यालयातून माता सरस्वतीची मूर्ती हटविण्यात यावी, कार्यालयात धार्मिक उपक्रम राबविण्यास मनाई करण्यात यावी व क्षमताला माता सरस्वतीच्या आराधनेत सहभागी होण्याची सक्ती करण्यात येऊ नये असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. 
 

Web Title: Challenge the worship of Mother Saraswati in the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.